गर्डर लॉन्चिग यशस्वीरित्या पूर्ण
मुंबई – धीरज घोलप
ईशान्य मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेले खासदार मनोज कोटक यांच्या अथक परिश्रमामुळे ईशान्य मुंबईचा विकास वेगाने सुरू आहे. लाल बहादूर शास्त्री मार्ग ते पूर्व द्रुतगती महामार्गाला जोडणाऱ्या नाहूर रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे पुलाच्या (आरओबी) रुंदीकरणाच्या कामाला वेग आला आहे.
शनिवारी मध्यरात्री दोन गर्डरचे यशस्वीरीत्या लॉन्चिग करण्यात आले. या पूलाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, याासाठी ईशान्य मुंबईचे खासदार मनोज कोटक सातत्याने पाठपुरावा करत आहेत. या पुलामुळे मुलुंड, भांडुप, कांजूरमार्ग येथील नागरिकांची नाहूर पुलावरील वाहतुकीच्या समस्येतून लवकरच सुटका होणार आहे.
नाहूर आणि मुलुंडदरम्यान वाहनांची वर्दळ वाढल्याने सध्याचा रेल्वे उड्डाणपूल (आरओबी) अपुरा पडत आहे. यामुळे पुलाच्या रुंदीकरणासाठी एकूण १४ गर्डर उभारण्यात येणार आहेत. यापैकी पहिल्या दोन गर्डरच्या उभारणीसाठी शनिवारी मध्यरात्री ब्लॉक घोषित करण्यात आला आहे.
या ब्लॉकदरम्यान 72 मीटर लांबीचे आणि 216 मेट्रिक टन वजनाचे दोन गर्डर यशस्वीरित्या टाकण्यात आले आहेत. नाहूर पुलाच्या रुंदीकरणाच्या पहिल्या टप्प्यात एकूण ८ गर्डर बसविण्याचे काम पूर्ण झाले असून दुसऱ्या टप्प्यात ६ नवीन गर्डर बसविण्याचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. नाहूर पुलाचे रुंदीकरण करण्यासाठी एकूण 14 गर्डर बसविण्यात येणार आहेत.
यासंदर्भात माहिती देताना खासदार मनोज कोटक म्हणाले, नाहूर पुलाच्या रुंदीकरणाचे काम लवकरच पूर्ण होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशाचा विकास होत आहे, त्यातच ईशान्य मुंबईचाही विकास वेगाने होत आहे.
ईशान्य मुंबईची वाहतूक समस्या सोडवण्यासाठी नाहूर पुलाच्या रुंदीकरणाच्या कामाबरोबरच विक्रोळी आणि विद्याविहार येथील रेल्वे ओव्हर ब्रिजचे काम सुरू आहे, तसेच भांडुप जेकेडब्ल्यू आणि घाटकोपर येथील रेल्वे ओव्हर ब्रिजचे कामही लवकरच सुरू होणार आहे.
घाटकोपरमध्ये जो रेल्वे ओव्हर ब्रिज बांधण्यात येणार आहे, तो केबल-स्टेड ब्रिज असेल, एकूण ईशान्य मुंबईला अधिक गतिशील करण्याचा प्रयत्न असणार आहे, असे खासदार मनोज कोटक यांनी सांगितले.