एकोडी (तिरोडा) – महेन्द्र कनोजे
स्थानिक वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या पालडोंगरी येथे जनवरी महिन्यात काळवीटाची शिकार करण्यात आली दरम्यान वनविभागाकडून गुन्हा दाखल न करता वन कर्मचाऱ्यांनी मूर्त काळवीस खड्डा खोदून दफन केलेली याबाबत वन जीवप्रेमीने माहितीसाठी अधिकारात माहिती मागितली असता आजपर्यंत ती मिळाली नाही.
त्यामुळे वन जीव प्रेमी ने राज्याचे वनमंत्री गोंदिया जिल्हाधिकारी अधीक्षक उपविभागी दंडाधिकारी तिरोडा व पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांना लेखी तक्रार दिली आहे याप्रकरणी अधिकारी व कर्मचाऱ्यावर कारवाई न झाल्यास उपवन संरक्षण कार्यालय गोंदिया समोर आंदोलन करण्याच्या इशारा दिला आहे.
तिरोडा वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या पालडोंगरी येथे ७ जनवरी रोजी वर्गएका मध्ये मोडत असलेल्या वन्यजीव काळविटाची शिकार करण्यात आली मूर्त काळविटाची शवविच्छेदन न करता पालडोंगरी चंदन तलाव जवळ वन कर्मचाऱ्यांनी खड्डा खोदून उरले वन विभागाकडे वन्य जीवाचे संरक्षण करण्याची जबाबदारी असताना वन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्याचे पालन न करता हे प्रकरण दडपण्याचे प्रयत्न केला याबाबत एकोडी येथील समीर केशवराव गभणे यांनी माहितीचे अधिकारता वनविभागाकडे माहिती मागितली असता त्यांनी माहिती देण्यात आली नाही,
त्यामुळे त्यांनी हे प्रकरण वन विभागाकडून दबवण्यात येत असल्याचे आरोप करीत 20 मे रोजी वन मंत्री जिल्हा अधिकारी पोलीस अधीक्षक विभागी. दंड अधिकारी आणि ठाणेदार यांच्याकडे तक्रार करून दोस्ती वर कारवाई करण्याची मागणी केली दरम्यान अधिकारी व कर्मचाऱ्यावर कारवाई झाली नाही तर गोंदियाच्या वनसंरक्षण कार्यालय समोर आहे.