Monday, December 23, 2024
Homeराज्यमायवाडी केंद्राची शैक्षणिक सहल...नागपूर दर्शन उपक्रम...

मायवाडी केंद्राची शैक्षणिक सहल…नागपूर दर्शन उपक्रम…

केंद्रप्रमुख पांडुरंग मानकर यांचे नियोजन.

९ शाळेतील २०० विद्यार्थी-शिक्षक सहभाग

नरखेड – चार भिंतीच्या आत शिक्षण घेतले जाते,मात्र अनुभवातून घेतलेले शिक्षण चिरकाल स्मरणात राहते.हेच गमक जाणून मायवाडी केंद्राचे केंद्रप्रमुख पांडुरंग मानकर यांनी शैक्षणिक सहल- नागपूर दर्शनचे आयोजन केले होते. ग्रामीण भागातील बऱ्याच विद्यार्थ्यांनी जिल्ह्याचे ठिकाण बघितले नव्हते.म्हणून आपल्या ऐतिहासिक, सांस्कृतिक व धार्मिक स्थळांची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी म्हणून ‘नागपूर दर्शन’ आयोजित केले होते.

यात नागपूर मधील मेट्रो स्टेशन, मध्यवर्ती संग्रहालय (अजाब बंगला), रमण विज्ञान केंद्र, विमानतळ,दिक्षाभूमी व स्वामी नारायण मंदिर इत्यादी ठिकाणी भेटी देण्यात आल्या. यात केंद्रातील मायवाडी,परसोडी (दिक्षित),जामगांव,जोलवाडी, उमठा,रानवाडी,करंजोली, सहजापूर,नायगाव(ठाकरे) इत्यादी नऊ शाळेतील १७५ विद्यार्थी, १८ शिक्षक व ७ ग्रामस्थ सहभागी झाले होते, अशी माहिती जोलवाडी शाळेचे मुख्याध्यापक अनिल धकीते यांनी दिली. विद्यार्थ्यांनी ‘नागपूर दर्शन’ मध्ये पुस्तकाबाहेरील अनुभव घेतले.या अनुभवाची शिदोरी त्यांचे ‘व्यक्तिमत्त्व’ घडविण्याकरिता उपयोगी पडेल.यामुळे विद्यार्थ्यांना ‘नाविन्यता व आनंद’ आत्मसात करता आला.

  • सौ.वैशाली निलेश वाघ
    शिक्षिका, जि.प.प्राथ.शाळा,रानवाडी
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: