Tuesday, November 26, 2024
Homeसामाजिकअसे समाज प्रबोधन करा की समाजामध्ये बदल झाला पाहीजे...

असे समाज प्रबोधन करा की समाजामध्ये बदल झाला पाहीजे…

  • गुरुकुंज येथील समारोहात शाहीर बहादुल्ला बराडे यांचे उद्गार
  • गुरुकुंज येथे साठे जयंती व होळकर स्मृतीदिन समारोहाचे आयोजन
  • शाहीर परीषद व गुरुदेव सेवा मंडळ यांचे संयुक्त विद्यमाने

रामटेक – राजू कापसे

महाराष्ट्र शाहीर परीषद शाखा रामटेक तालुका व अखील भारतीय गुरुदेव सेवा मंडळ शाखा रामटेक यांचे संयुक्त विद्यमाने लोकशाहीर अन्नाभाऊ साठे यांची जयंती व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा स्मृतीदिन समारोह शहरातील श्री गुरुदेव प्रार्थना मंदीर (गुरुकुंज) येथे नुकताच दि. २६ ऑगस्ट ला थाटात पार पडला. सदर समारोहाला महाराष्ट्र शाहीर परिषद पुणे चे विदर्भ प्रमुख कार्यवाह शाहीर बहादुल्ला बराडे हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.

दुपारी १२ वाजता दरम्यान सदर समारोहाला प्रारंभ झाला. यावेळी समारोहाचे उद्घाटक म्हणुन बार्टी चे समतादुत श्री राजेश राठोड तर प्रमुख अतिथी म्हणुन प्रा. डॉ जगदीश गुजरकर हे प्रामुख्याने उपस्थित होते.

समारोहादरम्यान महाराष्ट्र शाहीर परिषद पुणे चे विदर्भ प्रमुख कार्यवाह शाहीर बहादुल्ला बराडे यांनी उपस्थित शाहीर मंडळी तथा नागरीकांना आपल्या भाषणातुन ‘ असं काही समाज प्रबोधन करा की समाजामध्ये बदल झाला पाहीजे ‘ असे सांगत मोलाचे मार्गदर्शन केले.

त्याचप्रमाणे महाराष्ट्र ग्राहक पंचायत च्या जिल्हा ग्रामीण अध्यक्षा सौ कांचन माला माकडे यांचे ग्राहक संरक्षण परिषदेवर नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला, त्यांच्या अणुपस्थीत त्यांच्या पती मोरेश्वर माकडे यांनी तो स्विकारला. तालुक्यातील अनेक गावातील शाहीर कलावंतांनी भजना व काव्या द्वारे कला प्रदर्शित केली यात अनेक महिला कलावंताचा समावेश होता.

कार्यक्रमाची प्रास्ताविक प्रा.डॉ समर मोटघरे यांनी तर संचालन युवराजजी अडकणे यांनी केले. कार्यक्रमात तालुक्यातील विविध गावातील शाहीर कलावंतांनी आपली कला दाखवली. यावेळी उपस्थितांमध्ये परिवर्तन मंच चे राहुलजी जोहरे, नवनियुक्त जिलाध्यक्ष महाराष्ट्र शाहीर परिषद श्री तानबाजी श्रींगारे, शाहीरप्रेमी दिनेश मून,

अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ रामटेक चे सेवधिकरी मोरेश्वर माकडे गुरुजी, श्री श्रीधर पुंड गुरुजी , नंदुजी नेरकर , सौ कल्पणाताई मिरासे , श्री महेश सुरसे , सखाराम महाजन , भास्कर उमाळे, देवराव केवट, रामदास मतकर, मनोहरराव बावनकर गुरुजी , श्री मधुकरजी कुर्वे, प्रतिभाताई गजभिये मॅडम यांचेसह नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: