ED team Attacked : पश्चिम बंगालमधील टीएमसी नेते शाहजहान शेख यांच्या घरावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या ईडीच्या पथकावर समर्थकांकडून हल्ला करण्यात आला आहे. रेशन घोटाळ्याप्रकरणी तृणमूल काँग्रेसचे नेते शाहजहान शेख यांच्या घरावर छापा टाकण्यासाठी बंगालच्या उत्तर 24 परगणा येथे अंमलबजावणी संचालनालय आणि केंद्रीय सुरक्षा दलाच्या पथकावर शेकडो जमावाने हल्ला केला. या हल्ल्यात मीडियाच्या वाहनांचेही नुकसान झाले. ज्यात पत्रकार आणि कॅमेरापरसन जखमी झाले आहेत.
टीएमसी नेते शाहजहान शेख यांच्या शेकडो समर्थकांनी ईडी आणि निमलष्करी दलाच्या पथकावर हल्ला केल्याचा आरोप आहे. हल्ल्यादरम्यान घटनास्थळी उपस्थित असलेल्या अनेक माध्यमांच्या वाहनांचीही तोडफोड करण्यात आली. न्यूज 18 बांगलाच्या वार्ताहरालाही मारहाण करण्यात आली, त्यांच्या कारची तोडफोड करण्यात आली आणि कॅमेरा तोडण्यात आला. टीएमटी नेते शेख यांच्या समर्थकांनी ईडी अधिकाऱ्यांवर हल्ला केला, त्यामुळे छापा टाकता आला नाही.
विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी सोशल मीडिया साइट X वर सांगितले की, पश्चिम बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती खराब आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन ही अराजकता मोडून काढण्यासाठी योग्य ती कारवाई करावी, अशी विनंती त्यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांना केली. एवढेच नाही तर या हल्ल्यात रोहिंग्यांचा हात असू शकतो असा आरोपही त्यांनी केला.
#WATCH | North 24 Parganas, West Bengal: A team of the Enforcement Directorate (ED) attacked during a raid in West Bengal's Sandeshkhali.
— ANI (@ANI) January 5, 2024
More details are awaited pic.twitter.com/IBjnicU9qj