Monday, December 23, 2024
Homeखेळइझमायट्रिप पहिल्या वर्ल्ड टेनिस लीगची अधिकृत ट्रॅव्हल भागीदार...

इझमायट्रिप पहिल्या वर्ल्ड टेनिस लीगची अधिकृत ट्रॅव्हल भागीदार…

इझमायट्रिप या भारतातील सर्वात मोठ्या ऑनलाइन ट्रॅव्हल टेक व्यासपीठाने घोषणा केली की, बहुप्रतिक्षित वर्ल्ड टेनिस लीगच्या पहिल्याच पर्वासाठी त्यांची अधिकृत ट्रॅव्हल भागीदार म्हणून निवड करण्यात आली आहे. वर्ल्ड टेनिस लीग दुबईमध्ये कोका कोला अरेना येथे १९ ते २४ डिसेंबरपर्यंत खेळवण्यात येणार आहे. या सहयोगाचा एक भाग म्हणून इझमायट्रिप आपल्या ग्राहकांना दुबईसाठी खास क्युरेट केलेल्या पॅकेजेससह या महत्त्वपूर्ण इव्हेण्टचे साक्षीदार होण्याची अनोखी संधी देणार आहे.

हा सहयोग इझमायट्रिपला त्यांच्या निष्ठावान ग्राहकांना विशेष सवलत देण्यास सक्षम करेल. ग्राहक प्रोमो कोड: इएमटीडब्ल्यूटीएल१४ वापरून त्यांचे दुबईचे तिकीट बुक करू शकतात आणि कोका कोला अरेना प्लॅटफॉर्म व प्लॅटिनम लिस्टवर इव्हेण्टसाठी १४ टक्‍के सवलत मिळवू शकतात.

तसेच इझमायट्रिप एका भाग्यवान विजेत्याला या इव्हेण्टमध्ये सहभागी होणाऱ्या काही स्पोर्ट्स आयडॉल्सना भेटण्याची जीवनातील अमूल्य संधी देण्यासाठी स्पर्धा राबवणार आहे. या सहयोगाच्या मदतीने इझमायट्रिप ब्रॅण्ड इव्हेण्टदरम्यान अनेक असेट्सवर दृश्यमान होईल, जेथे हा इव्हेण्ट उत्तर व दक्षिण अमेरिका, युरोप, आशियासह १२० हून अधिक देशांमध्ये प्रसारित केला जाईल.

इझमायट्रिपचे सह-संस्थापक रिकांत पिट्टी म्हणाले, “टेनिस आणि त्यामधील बॅक-अॅण्ड-फोर्थ अॅक्शन लाखो प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेते. पहिल्यांदाच वर्ल्ड टेनिस लीग सुरू होत असताना आम्हाला जगभरातील लाखो टेनिस चाहत्यांशी संलग्न होण्याची ही अद्भुत संधी दिसून आली. आम्हाला उच्च-दृश्यमानता पैलू देणाऱ्या या सहयोगामध्ये पर्यटन उत्साही असलेल्या अनेक टेनिस चाहत्यांपर्यंत आमची पोहोच वाढवण्याची क्षमता आहे. आम्‍ही ही स्‍पर्धा पाहणाऱ्या प्रत्येक चाहत्याचे पसंतीचे ट्रॅव्हल भागीदार बनण्याची आशा करतो.’’

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: