Monday, December 23, 2024
HomeBreaking NewsEarthquake | अर्ध्या तासात दोनदा हादरली दिल्ली…भूकंपाच्या धक्क्याने पृथ्वी काही सेकंद थरथरली…

Earthquake | अर्ध्या तासात दोनदा हादरली दिल्ली…भूकंपाच्या धक्क्याने पृथ्वी काही सेकंद थरथरली…

Earthquake : दिल्ली एनसीआरमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. मंगळवारी दुपारी 2.51 च्या सुमारास झालेल्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.2 इतकी मोजली गेली. नेपाळमधील दिपायल येथे भूकंपाचा केंद्रबिंदू होता. याआधी नेपाळमध्ये दुपारी २.२५ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले होते, त्याची तीव्रता ४.६ मोजण्यात आली होती. दिल्ली, यूपीसह अनेक राज्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. गेल्या जूनमध्येही जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते.

यापूर्वी दुपारी २.२५ वाजताही भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्याचे केंद्रही नेपाळ होते. त्यावेळी त्याची तीव्रता 4.6 इतकी मोजली गेली होती. याचे धक्के उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशात जाणवले. अचानक पृथ्वी हादरल्याने लोक घाबरले. भूकंपाच्या वेळी भयानक दृश्ये समोर येत आहेत, हजारो लोक लिफ्टऐवजी पायऱ्यांवरून खाली धावताना दिसले.

श्रावस्तीमध्ये 2:51 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. दोनदा जोरदार धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता 4.6 इतकी होती. उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. दिल्लीशिवाय गाझियाबाद, नोएडा आणि फरीदाबादमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले.

गेल्या काही काळापासून भारत, नेपाळ, पाकिस्तान आणि भूतानच्या डोंगराळ भागात वारंवार भूकंप होत आहेत. विशेषत: हिमालय पर्वतरांगांमध्ये सतत भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. यासंदर्भात आयआयटी कानपूरच्या संशोधनात मोठा दावा करण्यात आला आहे. यानुसार भारतातील हिमालयीन राज्यांमध्ये कधीही विनाशकारी भूकंप येऊ शकतो. हा भूकंप 1505 आणि 1803 मध्ये झालेल्या भूकंपांसारखा असू शकतो. असा इशारा वैज्ञानिकांनी दिला होता.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: