Saturday, December 21, 2024
Homeराज्यBreaking News | लोकसभा निवडणुक दरम्यान होणाऱ्या आर्थिक व्यवहाराला आळा घालण्यासाठी नेमण्यात...

Breaking News | लोकसभा निवडणुक दरम्यान होणाऱ्या आर्थिक व्यवहाराला आळा घालण्यासाठी नेमण्यात आलेल्या चमुने नाकेबंदी दरम्यान भरारी पथकाने जप्त केले एक कोटी ७६ लाख रुपये…

गोंदिया – राजेशकुमार तायवाडे

गोंदिया जिल्हाधिकारी प्रदीप नायर यांच्या मार्गदर्शनात निवडणुकीदरम्यान होणाऱ्या आर्थिक व्यवहाराला आळा घालण्यासाठी नेमण्यात आलेल्या चमुने 27 मार्च रोजी सोनी नाका जवळ FST व SST टीमचे पथक प्रमुख बाबा शिंदे,सरिता लिलहारे, विलास सूर्यवंशी, रंजना चानप, रामानंदा दास, श्यामकला भोयर,

संदीप पटले यांनी संयुक्त कार्यवाही करत 1कोटी 76 लाख रक्कम जप्त केली. तसेच दुसऱ्या कारवाई मुंडीपार नाक्यावर जवळ झालेल्या नाकाबंदी दरम्यान पुन्हा 5 लाख रुपये रोख जप्त केले.

यावेळी तहसीलदार किसन भदाणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पंचनामा ,रक्कम सील करणे तसेच पंचनामा ESMS अँप वर भरून तसेच इतर कार्यवाही केली. पोलीस निरिक्षक अजय भुसारी व सहायक पोलीस निरिक्षक घोलप यांनी कायदेशीर कार्यवाही केली.तसेच तहसीलदार गोमासे व निवडणूक निर्णय अधीकारी पूजा गाइयकवाड यांनी मार्गदर्शन केले.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: