अकोला – संतोषकुमार गवई
जिल्हा कारागृह, तसेच महिला खुल्या कारागृहात बायोमेट्रिक टच स्क्रीन- ई किऑस्क सुविधा कार्यान्वित करण्यात आली. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव योगेश पैठणकर यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन झाले.
ई- किऑस्कमुळे बंदीजनांना स्वत:चे केस स्टेटस, खासगी बँकेचा तपशील, पुढील सुनावण्या तारीख, पॅरोल आदींच्या अर्जांची स्थिती, रोजगार मेहनताना आदी त्यांच्याशी निगडित माहिती पाहता येणार आहे. उच्च न्यायालयाच्या जनहित याचिकेवरील आदेशानुसार बंद्यांना ई- मुलाखत सुविधा सुरू करण्यात आली. त्यानुसार त्यांच्या नातेवाईक व वकीलांना ई- मुलाखत ॲपद्वारे काही दिवस आधी मुलाखत आरक्षित करता येऊ शकेल.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे मुख्य लोकअभिरक्षक श्री. उंबरकर, जिल्हा कारागृहाचे प्र. अधिक्षक ज्ञानेश्वर पाटील, वरिष्ठ तुरूंगाधिकारी अमृत आगाशे, रोहित बाविस्कर, वैद्यकीय अधिकारी रवींद्र आर्य आदी उपस्थित होते