सांगली – ज्योती मोरे
भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक प्रकोष्ट कोल्हापूर महानगरच्या माध्यमातून गणेशोत्सवाच्या काळात घेतलेल्या गौरी सजावट स्पर्धा आणि नवरात्रीच्या निमित्ताने कोल्हापुरातील स्वकर्तृत्वाने नाव कमावलेल्या महिलाचा सन्मान आयोजित केला होता.
यासाठी भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक प्रकोष्टच्या वतीने घेण्यात आलेल्या कार्यक्रमांमध्ये सौ.शुभांगी थोरात यांचा नवदुर्गा म्हणून सन्मान करण्यात आला. शाल श्रीफळ ओटीचे साहित्य आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांना गौरवण्यात आले. भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ट चया पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सौ.अमिषा करंबेळकर यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ट अध्यक्ष श्री नरेंद्र आमले तर प्रमुख पाहुणे म्हणून सांस्कृतिक प्रकोष्टचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष श्री ओंकार शुक्ल. नगरसेवक गटनेते श्री अजित ठाणेकर उपस्थित होते.
गौरी सजावट स्पर्धेचा निकालामध्ये प्रथम क्रमांक- मनीषा चव्हाण, द्वितीय क्रमांक- वासंती उंडाळे, तृतीय क्रमांक- अनुराधा सातवेकर,उत्तेजनार्थ एक क्रमांक-वंदना यादव, उत्तेजनार्थ दोन-आशा पाटील यांनी पारितोषिक पटकावले. यावेळी बोलताना श्री.नरेंद्र आमले म्हणाले, भारतीय जनता पार्टीच्या सांस्कृतिक प्रकोष्टच्या वतीने सुरू करण्यात आलेला हा उपक्रम स्तुत्य असून यामुळे महिलांना नवी ऊर्जा आणि उत्साह मिळतो आहे.
स्त्रीचे अनेक रूपे असतात या सर्व रूपामध्ये स्त्रिया कुठेही कमी पडत नाहीत. हेच स्त्रीशक्तीचे सगळ्यात मोठे उदाहरण आहे. यावेळेस त्यांनी स्त्रीच्या विविध रूपांची कविता वाचून दाखवली. त्यामुळे सर्व प्रेक्षक वर्ग भारावून गेले. प्रदेश उपाध्यक्ष ओंकार शुक्ल यांनी भारतीय स्त्रियाच याच संस्कृतीचे रक्षण आणि प्रसार करू शकतात.
जशी एक स्त्री शिकली की संपूर्ण कुटुंब शिकते तसे एक संस्कारित स्त्री संपूर्ण कुटुंब सुसंस्कृत ठेवू शकते असे यावेळी त्यांनी सांगितले. प्रदेश उपाध्यक्ष श्री. व्यंकटेश बिदनुर, श्री.अजित ठाणेकर आणि सत्कारमूर्ती सौ. शुभांगी थोरात यांनी मनोगत व्यक्त केले. सौ मानसी गुळवणी यांनी सूत्रसंचालन केले. श्री. शंकर देशपांडे आणि श्री.सतीश अंबर्डेकर यांनी नियोजन केले.