विंग फाऊंडेशनचे नदी वाचवा अभियान
नेरपिंगळाई – दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा मोर्शी तालुक्यातील नेरपिंगळाई येथे मोठ्या प्रमाणात नवरात्र उत्सव साजरा करण्यात आला व दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी रविवार ला दुपारी १२वाजता दुर्गा विसर्जन मिरवणूकीला सुरवात करण्यात आली दुर्गा देवी च्या मिरवणूक हि दरवर्षी प्रमाणे प्रमाणे गणपती विसर्जन मार्गाने निघाली ढोल ताशा दिंडी व हरीनामाच्या गजरात भाविक भक्त मिरवणुकीत सहभागी झाले होते.
यामध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला होता. तसेच दुर्गा देवीची स्थापनेपासून ते विसर्जन दिवसा पर्यंत निघणारे हार बेल फुले नदिमधे जाऊ नये नदिची स्वच्छता रहावि याकरिता विंग फाऊंडेशनचे कार्यकर्ते यांनी दुर्गा विसर्जन दरम्यान विविध सहकारी सोसायटी जवळ सर्व मंडळाचे हार बेल फुले जमा केला,
या दुर्गा देवी च्या विसर्जन कार्यक्रमात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोर्शी येथील उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिरखेड पोलिस स्टेशन चे ठाणेदार सचिन लुले, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल गवई, उपनिरीक्षक अमोल राठोड,बीट जमादार मनोज कळसकर,खुपिया वैभव घोगरे, पंकज चौधरी पोलिस कर्मचारी व पोलिस पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता सायंकाळी पाच ते सहा पर्यंत सर्व दुर्गा देवी चे शांततेत विसर्जन पार पडले.