Saturday, September 7, 2024
spot_img
Homeराज्यक्रीडा महोत्सवामुळे विद्यार्थ्यांतील कौशल्य व सुप्त गुणांना वाव - माजी आमदार राजेंद्रजी...

क्रीडा महोत्सवामुळे विद्यार्थ्यांतील कौशल्य व सुप्त गुणांना वाव – माजी आमदार राजेंद्रजी जैन…

अटल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव पुरस्कार वितरण सोहळाचे शानदार आयोजन…

गोंदिया – राजेशकुमार तायवाडे

अटल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव पुरस्कार वितरण सोहळाचे शानदार आयोजन प्रसंगी भारतरत्न माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयीजी यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन करीत माजी आमदार राजेन्द्रजी जैन म्हणाले की, विद्यार्थी अवस्था हि परिवर्तनशील असून त्यांच्या कलागुणांना जेवढी योग्य संधी मिळेल तेवढीच त्यांची प्रखरतेने व उत्कृष्ठपणे जडण घडण होत असते.

विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक तसेच शारीरिक खेळांतील कौशल्यांचा व सुप्त गुणांना वाव मिळावा व शैक्षणिक प्रगती सोबतच त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून शाळांच्या विद्यार्थ्यांना खेळ व सांस्कृतिक मंच उपलब्ध करून देण्याचे उत्कृष्ट कार्य जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले व त्याच्या सहकाऱ्यांनी केले आहे. यामुळे अनेक प्रतिभावान विद्यार्थी बाहेर येतील आणि विविध स्तरावर नावलौकिक करतील असे प्रतिपादन माजी आमदार राजेंद्रजी जैन यांनी केले.

२२ ते २५ डिसेंबर अश्या चार दिवसीय कालावधीत जिल्हा स्तरीय अटल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचा पुरस्कार वितरण समारोह शहीद जान्या तिम्या जिल्हा परिषद हायस्कूल, गोरेगाव येथे पार पडला. पुरस्कार वितरण समारोहाला माजी आमदार राजेंद्रजी जैन, जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले, आमदार मनोहर चंद्रिकापुरे, आमदार विजय रहांगडाले, आमदार विनोद अग्रवाल, माजी आमदार परिणय फुके, बाळा अंजनकर, माजी आमदार संजय पुराम सहित मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान चार दिवसीय अटल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात शालेय विद्यार्थ्यांचे सांघिक खेळ, कबड्डी, खो – खो, सांस्कृतिक कार्यक्रम, लेझीम, प्रेक्षणीय कवायती, सोबतच जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे सांघिक व वैयक्तिक खेळ तसेच गायन व एकपात्री प्रयोगाचे कार्यक्रम सादर करण्यात आले.यात उत्कृष्ठ सांघिक व वैयक्तिक खेळ व सांस्कृतिक सादरीकरणाला मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: