अकोला जिल्ह्यातील पिंजर येथील दिपक सदाफळे यांची टीम आपत्ती किंवा रुग्ण सेवा कार्यात नेहमीच पुढाकार घेवून आजपर्यंत हजारो लोकांचे प्राण या टीम वाचविले आहे. कालही या टीमने तत्परता दाखवत एका शेतकऱ्यांचे प्राण वाचविले आहे. मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथक,पिंजर जिल्हा अकोला यांच्या रुग्णसेवा कार्यतत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दीपक सदाफळे यांनी सांगितल्या प्रमाणे, काल विजयादशमीचा उत्सव साजरा करीत असतांना रात्रीच 8:00 वाजता प्राथमिक आरोग्य केंद्रातुन निहीदा येथील ठाकरे पाटलांचा फोन आला की दिपकभाऊ लवकर या इमर्जन्सी पेशंट आहे येथील डाॅक्टरांनी तपासले असता तात्काळ अकोला घेऊन जायचे सांगीतले आपण लवकर या तेव्हा नेमकंच पुजा करुन जेवायला बसलेले जिवरक्षक दिपक सदाफळे हे सर्व सोडुन क्षणाचाही विलंब न करता अवघ्या दोनच मिनटात दवाखान्यात गाडी घेऊन पोहचले आणी पुढील उपचारासाठी अकोला जिल्हा रुग्णालयाकडे रवाना झाले आणी अवघ्या 40 मिनटात जिल्हा रुग्णालयात दाखल केले तेथे योग्य व तात्काळ उपाचार झाले आणी सक्सेन मशीनद्वारे विष बाहेर निघाले.
आता रुग्ण सुरक्षित आहे हा आनंद त्या परिवारातील पत्नी व मुलाच्या चेह-यावर दिसुन आल्याने यावेळी आपण रुग्णसेवेच्या स्वरुपात जिवरक्षक सेवेची खुप मोठी संपत्ती कमावत असल्यास स्वतालाच स्वतःचाच सार्थ अभिमान आहे वाटत होते असे मत दिपक सदाफळे यांनी बोलुन दाखविले यामध्ये निहीदा येथील अतुल ठाकरे,शुभम ठाकरे,मोहन धोटे,गोपाल काळे,गणेश काळे, यांनी मोठे सहकार्य केले तसेच याच रात्री 10 वाजता आमचे सहकारी मयुर सळेदार आणी मयुर कळसकार यांनी महागाव येथील अपघातील आणलेला पेशंट सुद्धा सुखरुप असल्याची माहीती दीली आहे अशी माहिती निहीदा येथील पोलीस पाटील विजय पाटील ठाकरे यांनी दीली आहे.
अशीच एक दुसरी घटना महागाव येथील युवक अपघातात जखमी होऊन पुर्ण:त बेशुद्ध अवस्थेत असलेल्या जखमीला दिपक सदाफळे यांचे सहकारी मयुर सळेदार मयुर कळसकार यांनी अकोला येथे योग्य वेळी पोहचवुन दिल्याने त्याला सुद्धा जिवनदान मिळाले ऐन विजयादशमीच्या पुजेच्या वेळी फोन आले आणी क्षणाचाही विलंब न करता सर्व सोडुन आंम्ही अकोला कडे पेशंटला घेऊन निघालो आणी रुग्णवाचला दोन्ही कुटुंबात आनंद द्विगुणीत झाला यामुळे आंम्हाला खुप मोठे समाधान झाले*