Sunday, November 17, 2024
Homeराज्यमुरमाचे अवैद्य उत्कखनाची चौकशी न केल्याने आत्मदहनाची मागीतली परवानगी देऊळगाव येथील प्रकार...

मुरमाचे अवैद्य उत्कखनाची चौकशी न केल्याने आत्मदहनाची मागीतली परवानगी देऊळगाव येथील प्रकार…

महसूल विभागाकडून चौकशी सुरू

पातूर – निशांत गवई

पातूर तालुक्यातील देऊळगाव येथे गट क्रमांक 280 मध्ये सन 2021 – 22 मध्ये लाखों रुपये मुरमाचे अवैद्य उत्खलन करण्यात आले असून याप्रकरणी दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्याबाबत फेब्रुवारी महिन्यात देऊळगाव येथील शंकर बराटे यांनी केली होती परंतु चार महिने उलटून सुद्धा कोणती चौकशी न झाल्याने आत्मदहनाची परवानगी देण्यात यावी अशी निवेदन तक्रारकर्तानी महसूल विभाग दिले आहे या नंतर महसूल विभागाला खडबडून जाग आली असून या गट सर्वे नंबर मधील अवैध मुरुमाचे उत्खलन बाबत बुधवारी मंडळ अधिकारी यांच्या मार्फत चौकशी करण्यात आली आहे.

तालुक्यातील देऊळगाव येथे गट नंबर 280 मध्ये 2021 – 22 मध्ये काही राजकीय पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मुरुमाचेअवैद्य उत्कखन करून मुरमाची मोठ्या प्रमाणात विक्री केल्याची तक्रार देउळगाव येथील 75 वर्षीय शंकर बराटे व काही जणांनी पातुर तहसीलदार यांच्याकडे केली होती परंतु गेल्या चार महिन्यापासून या प्रकरणाकडे महसूल विभागाने कोणतीही दखल घेतली नाही लाखो रुपयांचे मुरमाचे अवैद्य उत्कलन करून त्याची विक्री करण्यात आल्यानंतरही महसूल विभाग कुंभकर्णी झोपेत होता असा आरोप करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे ज्यावेळी उत्खनन सुरू होते त्यावेळेस सुद्धा महसूल विभागाच्या तात्कालीन कर्मचाऱ्याने कोणताही कारवाई करण्याचे धाडस दाखविले नसल्याचे तक्रार करण्याचे म्हणणे आहे फेब्रुवारी महिन्यात याप्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतरही चार महिने उलटून सुद्धा कोणतीही चौकशी करण्यात आली नाही याप्रकरणी तक्रारकर्मंतानी मत्रालयापर्यंत सुद्धा पत्र व्यवहार करुन आपल्या तक्रारी सादर केले आहे परंतु तरीही साधी चौकशी सुद्धा न झाल्याने शंकर बराटे यांनी पातुर तहसीलदार यांना आत्मदहनचा इशारा दिला असून ३० मे रोजी आयुक्त यांनी दिलेल्या आदेशानुसार चौकशी करण्यात यावी अन्यथा १५ आगस्ट रोजी आत्मदहन करण्याची परवानगी द्यावी असे निवेदनात म्हटले आहे या नंतर महसूल विभाग खडबडून जागा झाला याप्रकरणी मंडळाधिकारी शेफाली देशमुख व तलाठी यांनी बुधवारी देउळगाव येथील
गट नंबर 280 मध्ये जाऊन झालेल्या उत्खलनाबाबत जागेचा पंचनामा केला दोन वर्षापूर्वी झालेले उत्कलन असल्याने याबाबत कसा पंचनामा तयार करण्यात आला आहे याबाबत विविध चर्चेला पेव फुटले आहे सदर मुरुमाचे अवैध उत्कलन गावातील काही राजकीय पदाधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचे तक्रार करण्याचे म्हणणे आहे दरम्यान याप्रकरणी चौकशी न झाल्यास १5 ऑगस्ट रोजी आत्मदहन करण्याची परवानगी देण्यात यावी अशी निवेदन शंकर बराटे यांनी दिली आहे या नंतर बुधवारी या प्रकरणाची चौकशी मंडळ अधिकारी यांच्या मार्फत आली असून त्याचा अहवाल तहसीलदार यांच्याकडे सादर करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

देउळगाव येथील शेत सर्वे नंबर 280 मध्ये मुरुमाचे अवैद्य उत्कलन झाले असल्याची तक्रारीवरून तहसीलदार यांच्या आदेशाने सर्वे नंबर 280 मध्ये जाऊन आज चौकशी व पंचनामा केला असून त्याचा अहवाल तहसीलदार यांच्याकडे सादर केला आहे. शेफाली देशमुख, मंडळ अधिकारी पातूर

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: