Saturday, December 21, 2024
HomeBreaking Newsरस्त्याअभावी गर्भवती महिलेने वाटेतच दिला बालकाला जन्म…मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील घटना...

रस्त्याअभावी गर्भवती महिलेने वाटेतच दिला बालकाला जन्म…मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील घटना…

एकीकडे चंद्रावर आपलं वर्चस्व स्थपित करण्याचा मानस…. तर दुसरीकडे खेड्या पाड्यात धड रस्ता नाही….

शहापूर : प्रफुल्ल शेवाळे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा असलेल्या ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील वेळूक ग्रामपंचायत मधील पटकीचापाडा येथील गर्भवती महिलेला प्रसूती साठी डोली करून कसारा (PHC) येथे दाखल करण्यासाठी गावकऱ्यांनी डोली करून आणयाचे होते, परंतु रस्त्या अभावी या गर्भवती महिलेची वाटेतच प्रसूती झाली त्यानंतर या महिलेला कसारा येथे दाखल करण्यात आले आहे.

2018 मध्ये रस्ता मंजूर झालेला असताना ठेकेदारा ने केवळ फलक लावल्याचे दिसून येतेय. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत वेळूक ते पटकीचापाडा हा रस्ता अपूर्ण राहिल्याने येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अशा घटनांना नक्की जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित राहिल्या शिवाय राहणार नाहीच…

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: