नागपूर – विलेपार्ले येथील पालिकेचे डॉ आर. एन. कूपर रुग्णालयामधील हॉस्टेल बांधून पूर्ण झाले आहे, मात्र हॉस्टेल इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) नसल्याने ग्रामीण भागातून वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांची मोठया प्रमाणात गैरसोय होत असल्याचा मुद्दा विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज सभागृहात उपस्थित केला.
तसेच कूपर रुग्णालयातील नेफ्रोलॉजी, बर्न युनिट सुरू करावे ही स्थानिकांची मागणी देखील दानवे यांनी उपस्थित करुन हे विभाग लवकरात लवकर सुरू करावे, अशी मागणी केली.
यावर उत्तर देताना मुख्यमंत्री यांनी हॉस्टेलच्या ओसीचा विषय तात्काळ निकाली काढण्याचे निर्देश देण्यात येईल असे सांगत, रुग्णालयात असलेली इतर गैरसोय तातडीने दूर करण्याची ग्वाही दिली.