Sunday, December 22, 2024
Homeगुन्हेगारीअतिवृष्टी पावसामुळे तुन्डीया नाल्यामध्ये बुडून मृत्यु...

अतिवृष्टी पावसामुळे तुन्डीया नाल्यामध्ये बुडून मृत्यु…

रामटेक – राजु कापसे

1) मृतक – श्री. हरिचंद छोटेलाल वरखडे, वय 65 वर्षे रा. बेलदा यांचा दिनांक 21/07/2022 रोजी अतिवृष्टी पावसामुळे तुन्डीया नाल्यामध्ये बुडून मृत्यु झाल्याने सदर मृतकाचा शवविच्छेदन अहवाल अपुर्ण असल्याने सन 2022-23 या वित्तीय वर्षात मृतकाच्या कुटुंबियांना अनुदान वाटप करण्यात आले नसल्याने मा. जिल्हाधिकारी नागपूर (राजस्व शाखा) यांना सदर मृतक श्री. हरिचंद छोटेलाल वरखडे यांचे कुटुंबियांना सन 2023-24 मध्ये आर्थिक लाभ प्रदान करण्यात यावा किंवा कसे याबाबत मार्गदर्शन मागविण्यात आले होते.

सदर प्रकरणात मा. जिल्हाधिकारी नागपूर यांचे मार्गदर्शन प्राप्त झाल्याने मृतकाची पत्नी श्रीमती मनुला हरिचंद वरखडे यांना रक्कम रुपये 4,00,000/- दिनांक 17/10/2023 रोजी धनादेशाद्वारे अदा करण्यात आले आहे.

2) मृतक – श्री. लालचंद मुकुंद धुर्वे वय 34 वर्षे रा. छत्रापुर, ता. रामटेक दिनांक 29/09/2023 रोजी विज पडून मृत्यू सदर मृतकाचे वारसान पत्नी श्रीमती छाया लालचंद धुर्वे यांना रक्कम रुपये 4,00,000/- दिनांक 17/10/2023 रोजी धनादेशाद्वारे अदा करण्यात आले आहे.

3) श्री. मंगल नथ्थु केळवदे वय 60 वर्षे रा. जयप्रकाश वार्ड रामटेक यांना दिनांक 21/09/2023 रोजी गडमंदीर रामटेक येथे विज दगडावर पडली असुन दगड उडून पायाला लरागलू असुन आपातग्रस्त यांचे पायात पाच टाके लागल्याने जखमी झाले असुन रुपये 5400/- दिनांक 17/10/2023 रोजी धनादेशाद्वारे अदा करण्यात आले आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: