रामटेक – राजु कापसे
रामटेक परिसरात 17 जुलै रोजी दुपारी चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी भात लावणीची कामे सुरू केली. विशेष म्हणजे भात लावणीसाठी हीच योग्य वेळ आहे. 18 जुलै रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत रामटेक शहरात 53 मिमी, देवलापारमध्ये शुन्य मिमी, नगरधनमध्ये 40 मिमी आणि मुसेवाडीमध्ये 40 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
सरासरी पाऊस 33 मिमी झाला असून आतापर्यंत एकूण सरासरी 404 मिमी पाऊस झाला आहे. लोडोंगरी येथील शेतकरी उमाकांत घरजाळे यांनी पाऊस पडताच भात लावणीच्या कामाला सुरुवात केली. लावणीच्या वेळी कामगारांना एक महिन्याच्या रोजगार मिळतो.