Sunday, November 17, 2024
Homeराज्यशेतकऱ्यांच्या शेतातील पाणी नाला करून काढा...

शेतकऱ्यांच्या शेतातील पाणी नाला करून काढा…

माजी आमदार मल्लिकार्जून रेड्डी यांचे पाहणीदरम्यान आदेश

रामटेक – राजू कापसे

रामटेक तालुक्यातील किरनापुर काचुरवाही परिसरातील खाणीतील डम्पिंगमुळे शेतकऱ्यांचा शेतात पाणी साचून राहत होते.त्यामुळे शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान होत होते.शेतकर्यांनी माजी आमदार मल्लिकार्जून रेड्डी यांच्याकडे तक्रार केली असता माजी आमदार मल्लिकार्जून रेड्डी यांनी आज स्वतः शेतकऱ्यांचा शेतावर जाऊन पाहणी केली.शेतकर्यांनी आपल्या व्यथा माजी आमदार मल्लिकार्जून रेड्डी यांना माईंन अधिकारी यांच्यासमोर सांगितले.माजी आमदार रेड्डी यांनी लवकरात लवकर नाला करून शेतातील पाणी निकासी करण्याचे आदेश माईनिग अधिकारी यांना दिले.

माजी आमदार मल्लिकार्जून रेड्डी यांनी तत्काळ तहसीलदार यांना फोनद्वारे संपर्क करून पाहणी करण्याचे सांगितले.शेतकऱ्यांचे समस्याचे निकारन करून देण्याचे तहसीलदार यांना माजी आमदार मल्लिकार्जून रेड्डी यांनी सांगितले. पाहणीदरम्यान भाजपा तालुका अध्यक्ष राहुल किरपान,माईंन चे मॅनेजर अनुराग पांडे,शेख साहेब,शेतकरी भगवान डोकरीमारे,विठ्ठल मोहनकर, सरसराम हटवार,मुकेश वागधरे सह शेतकरी बांधव उपस्थित होते.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: