मूर्तिजापूर मतदार संघाचे वंचित बहुजन आघाडी चे उमेदवार डॉ.सुगत वाघमारे यांना मुर्तिजापूर तालुका व बार्शीटाकळी तालुका च्या उलमा चा एकजूट फैसला करून बार्शी टाकळी चे ज्येष्ठ साहित्यिक व कवी डॉ महेबुब राही यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर पाठिंबा देण्यात आला.
यावेळी लेटर पैड वर मुस्लिम समाजा च्या विरोधात द्वेष पूर्ण भाषणे रोखण्याच्या कायदा लावण्यास प्रयत्न करने,शेतकऱ्यांना 24 तास वीज तसेच त्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा यासाठी आवश्यक ते प्रयत्न करणे,मुस्लिमांना 10 टक्के आरक्षण साठी प्रयत्न करने तसेच मुर्तिजापूर विधानसभा मतदासंघातील वीज पाणी रस्ते इत्यादी मूलभूत सेवा उपलब्ध करून देण्या साठी प्रयत्न करने आदी मांगण्या चे लेखी आश्वासन देत त्यांना जाहीर पाठिंबा जाहीर केला.
यावेळी बार्शी टाकळी – मुर्तिजापूर विधानसभा मतदासंघातील वंचित बहुजन आघाडी चे उमेदवार डॉ सुगत वाघमारे, वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय ज्येष्ठ नेते सुजात आंबेडकर, उलमा मुर्तिजापूर तालुका अध्यक्ष मौलाना सदरोद्दीन, बार्शी टाकळी तालुका अध्यक्ष मौलाना अब्दुल सलाम, सचिव हाजी सय्यद आशिक,हाजी मोहम्मद सलीम महक,
हाजी सय्यद रागिब, मुफीज खान, सामाजिक कार्यकरते मोहम्मद आसिफ, बार्शी टाकळी वंचित बहुजन आघाडी चे ज्येष्ठ नेते नई मोद्दीन शेख,विशाल शिंदे, मुफती मुजाहिद उल इस्लाम खान, मजहर उल इस्लाम खान आदी यावेळी उपस्थित होते.