श्री राज राजेश्वर मंदिर पासून निघणार समाजाची भव्य शोभायात्रा…
पर्यावरण समतोल राखण्यासाठी पातूरच्या माळरानावर सिडबाल टाकणार!
अकोला – संतोषकुमार गवई
माहेश्वरी समाजाचा उत्पती दिवस म्हटल्या जाणाऱ्या पावन महेश नवमीचे आयोजन दि 15 जून रोजी सकल माहेश्वरी समाजाच्या वतीने करण्यात आले आहे. या अनुषंगाने माहेश्वरी समाज ट्रस्ट व संलग्न संस्थांच्या वतीने महानगरात महेश नवमी उत्सव साजरा करण्यात येत असून यावर्षी महेश नवमी उत्सवाचे प्रमुख पाहुणे म्हणून गीता परिवाराचे राष्ट्रीय अध्यक्ष, मालपाणी उद्योग समूह संगमनेरचे प्रमुख, ज्येष्ठ सेवाभावी डो संजय मालपाणी हे उपस्थित राहणार आहेत.
तर उत्सवाचे पूजा यजमान म्हणून गणेश मुंदडा व सौ संगीता मुंदा यांची उपस्थिती लाभणार असून उत्सवात अनेक रंगारंग उपक्रमांची रेलचेल राहणार असल्याची माहिती माहेश्वरी समाज ट्रस्टच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. स्थानीय माहेश्वरी भवनात संपन्न झालेल्या पत्रकार परिषदेत माहेश्वरी समाज ट्रस्टचे अध्यक्ष विजय पनपालिया, प्रधानमंत्री विजयकुमार राठी, उत्सव प्रमुख शांतौलाल भाला, महिला मंडळाच्या अध्यक्षा शिल्या चांडक, प्रगती मंडळ अध्यक्ष आनंद डागा, नवयुवती मंडल अध्यक्ष साची झंवर आदी मान्यवर उपस्थित होते.
दरवर्षी सकल माहेश्वरी समाज अनेक उपक्रमाच्या माध्यमातून हा महेश नवमी उत्सव साजरा करीत असतो. यावर्षी महेश नवमी पर्चात अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महेश नवमीचा मुख्य सोहळा शनिवार दि 15 जून रोजी होत असून सकाळी 9 वाजता महेश आरती ने या उत्सवाच्या प्रारंभ होणार आहे. त्यानंतर सकाळी 9-30 माहेश्वरी समाज ट्रस्ट व गीता परिवारा अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने प्रमुख पाहुणे डॉ संजय मालपाणी यांची “जानो गीता बनो विजेता’ या विषयावर कार्यशाळा होणार आहे.
दुपारी 4-30 वाजता राज राजेश्वर मंदिरापासून भगवान महेश यांची विविध देखावे व झांकी समवेत शोभायात्रा निघणार आहे. ही शोभायात्रा जयहिंद चौक, सिटी कोतवाली, टिळक रोड, ब्रजलाल बियाणी चौक, जुना कापड बाजार, जैन मंदिर, गांधी चौक, मनपा चौक, तहसील मार्गे माहेश्वरी भवन येथे पोहचून या शोभायात्रेचे समापन होणार आहे. माहेश्वरी भवन येथे सायंकाळी 6-45 वाजता पूजा यजमान गणेश मुंदडा, सौ संगीता मुंदडा यांच्या हस्ते भगवान महेश यांची पूजा अर्चना होऊन मुख्य महेश नवमी सोहळा सायंकाळी 7-30 वाजता होणार आहे. यात प्रमुख पाहुणे डॉ संजय मालपानी हे समाज बांधवांना मार्गदर्शन करणार आहेत.
दरम्यान महेश नवमी उत्सव सप्ताहात स्व. शेठ राधाकिशन तोष्णीवाल यांच्या स्मृतीत बॉक्स क्रिकेट स्पर्धा महेश भवन येथे संपन्न झाल्यात. उत्सवात सोमवार दिनांक 10 जून रोजी सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत माहेश्वरी भवनात संपूर्ण रक्त परीक्षण व आरोग्य मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या दिनी सायंकाळी 7 वाजता भगवान महेश झाकी स्थापना करण्यात येऊन आरती होणार आहे. त्यानंतर सायंकाळी 7-30 वाजता मिले सुर मेरा तुम्हारा हा देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम होणार आहे. मंगळवार दिनांक 11 जून रोजी सकाळी 6 वाजता माहेश्वरी भवन येथे प्रगती मंडळाच्या वतीने मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
त्यानंतर सकाळी 10 वाजता शासकीय महिला रुग्णालयात महिला रुग्णांना सौ देवकीबाई विजयकुमार सोमानी चेरीटेबल ट्रस्टच्या वतीने रुग्णांना फळ वितरण करण्यात येणार आहे. साय 6-30 वाजता माहेश्वरी भवन येथे महिला मंडळाच्या वतीने भक्ती मुळेच निराकार साकार होतो हा भक्तीपूर्ण सास्कृतिक कार्यक्रम होणार आहे. बुधवार दिनांक 12 जून रोजी माहेश्वरी नवयुवती मंडळाच्या वतीने सकाळी 7 वाजता माहेश्वरी भवन येथे हॅप्पी स्ट्रीट हा आगळावेगळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यानंतर सकाळी 10 वाजता आनंद बांगड परिवार व सौ प्रेमवती पोरवाल परिवाराच्या वतीने शासकीय सर्वोपचार रुग्णालयात स्रणांना फळ वितरण करण्यात येणार आहे, तसेच सायंकाळी 5 वाजता अकोला माहेश्वरी समाज वरिष्ठ नागरिक महिला प्रकोष्ठच्या वतीने नारी सशक्तिकरण या विषयावर प्रश्नमंजुषा हा प्रश्नोत्तराचा कार्यक्रम होणार आहे. तर रात्री ८ राजता एक शाम महेश के नाम हां कार्यक्रम सौ निधि पवन मंत्री करणार आहे.
गुरुवार दिनांक 13 जून रोजी सकाळी 9-30 वाजता माहेश्वरी गती मंडळाच्या वतीने माहेश्वरी भवनात विविध खेलकूद स्पर्धा घेण्यात येणार आहेत. तसेच दुपारी 4-30 वाजता माहेश्वरी भवनात अकोला श्वरी समाज वरिष्ठ नागरिक प्रकोष्हच्या वतीने वादविवाद स्पर्धा होणार असून कौटुंबिक संबंधात समाज माध्यमांचा वाढत चाललेला प्रभाव “दायक की हानिकारक या विषयावर ही वादविवाद स्पर्धा घेण्यात येणार आहे. शुक्रवार दिनांक 14 जून रोजी सकाळी 9-30 वाजता माहेश्वरी येथे व्यवसाय व रोजगारची शाळा या विषयावर विपीन धूत है मार्गदर्शन करणार आहेत.
त्याचप्रमाणे दुपारी 4-30 वाजता माहेश्वरी समाज न्या वतीने शालेय पारितोषिक व अन्य पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून शिप अॅड लॅपटॉप कमिटी पुणे चे अध्यक्ष डॉ श्याम चांडक हे राहणार असून प्रमुख उपस्थिती म्हणून राधाकिशन तोष्णीवाल पब्लिक न ट्रस्ट अध्यक्ष विजयकुमार तोष्णीवाल हे उपस्थित राहणार आहेत. माहेश्वरी समाज ट्रस्ट व सलग्न संस्थांच्या वतीने आयोजित या वर्यक्रम, शोभायात्रा व मुख्य नवमी सोहळ्यात समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन माहेश्वरी समाज ट्रस्टचे विजय पनपालिया, उत्सव प्रमुख शांतीलाल भाला, उपाध्यक्ष सुधीर रांदड, प्रधानमंत्री विजयकुमार राठी,
सहाय्यक मंत्री विनित पाध्यक्ष डॉ. आशिष पनपालिया, अंकेक्षक अनिल नटूरिया, सदस्य विजयकुमार तोष्णीवाल, राजेश लोहिया, अनिल राठी, नरेश बियाणी, त्यांडक, पुरुषोत्तम खटोड, मनीष लड्डा, नंदकिशोर बाहेती, प्रा रमण हेडा, सीए मनोज चांडक, प्रवीण हैडा, राजेश सोमानी, शैलेश तोष्णीवाल, ब्ली, एड विशाल लड्डा, प्रमोद लदूरिया, महेश मुंदडा, दीपक राठी, प्रदीप राठी, महिला मंडळ अध्यक्ष शिल्पा चांडक, सचिव ज्योती कारी प्रगती मंडळाचे अध्यक्ष आनंद डागा, सचिव आशिष गांधी, माहेश्वरी नवयुवती मंडळाच्या अध्यक्ष कु साक्षी झंवर, सचिव कु. भुमिका बियाणी , अकोला माहेश्वरी समाज वरिष्ठ नागरिक प्रकोष्ठचे अध्यक्ष प्रा गोपीकिसन कासट, सचिव राजीव मुंदडा, अकोला माहेश्वरी समाज महिला प्रकोष्ठचे अध्यक्ष सरोज लढ्ढा सचिव मंगला तापडीया समवेत समस्त पदाधिकारी व सदस्यांनी केले.