पातुर – निशांत गवई
पातुर येथील डॉ. एच. एन. सिन्हा कला व वाणिज्य महाविद्यालयात नुकतेच पदवी वितरण सोहळा आयोजित करण्यात आला. या पदवी वितरण सोहळ्याकरिता अध्यक्षीय स्थान.दिलीप इंगोले यांनी भूषविले.आजच्या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून पातुर चे तहसीलचे नवनिर्वाचित तहसीलदार अरुण काळे हे लाभले.
प्रमुख उपस्थितीमध्ये माननीय अशोकराव देशमुख आजीवन सदस्य श्री.शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती, माननीय विनायकराव जी फुंडकर आणि माननीय विलासरावजी हरणे हे होते.तसेच व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ किरण खंडारे, मानव्य विद्याशाखा प्रमुख डॉ. चंदन राठोड, वाणिज्य शाखाप्रमुख हर्षद एकबोटे आणि विज्ञान शाखाप्रमुख डॉ. संजय खान्देल हे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन , दीपप्रज्वलनाने झाली.तद्नंतर राष्ट्रगीत व विद्यापीठ गीताने झाली.नंतर प्रमुख अतिथींचा शॉल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.तसेच महाविद्यालयातील क्रीडा विभागातील गोल्ड, सिल्व्हर आणि कांस्य तसेच कलरकोट पटकाविणाऱ्या विद्यार्थ्यीवर्गाचा सत्कार करण्यात आला.नंतर पदवी वितरण सोहळ्याला सुरुवात झाली.यामध्ये कला शाखेचे ८५विद्यार्थी, वाणिज्य शाखाचे२७ विद्यार्थी आणि विज्ञान शाखेच्या ९१ विद्यार्थ्यांना पदवी वितरित करण्यात आली.
याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक अरुण काळे यांनी आपल्या मार्गदर्शनात अपयश हीच यशाची खरी पायरी आहे.असे सांगून विद्यार्थ्यांशी स्वानुभव कथन करुन हितगुज केले. त्यांच्या मार्गदर्शनानंतर संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीप इंगोले साहेब यांनी आपल्या विचार मंथनातून विद्यार्थी पदवी प्राप्त केल्यानंतर स्पर्धात्मक क्षेत्रात आपले करिअर घडवू शकतो, विविध दालन विद्यार्थी वर्गाकरिता खुला असल्याने योग्य दिशा व मार्गदर्शन असेल तर विद्यार्थी स्वतः चे भविष्य घडवू शकतो.असे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा डॉ.दिपाली घोगरे यांनी सांभाळली तर आभार प्रा.अतुल विखे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ किरण खंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली झाले.कार्यक्रमाला सर्व प्राध्यापक व्रृंद, शिक्षकेतर कर्मचारी तथा विद्यार्थी,पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.