अमरावती – सुनील भोळे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय फ्रेझरपुरा अमरावती मध्ये 22 ते 28 जुलै दरम्यान राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 तसेच केंद्र शासनातर्फे दिलेल्या सूचनानुसार चौथ्या वर्धापन दिवसा निमित्ताने शिक्षण सप्ताह यशस्वीरित्या राबविण्यात आला.
या शिक्षण सप्ताह निमित्ताने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा त्यांना व्यवहार ज्ञान मिळावे विविध संस्कृतीची ओळख व्हावी या गोष्टीवर विशेष भर दिला गेला यामुळे शालेय जीवनात शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांच्या सामाजिक ज्ञानात भर पडून सर्व गुण संपन्न विद्यार्थी तयार होण्यास मदत होणार आहे.
विद्यार्थी वर्गाने तयार केलेल्या कवितांचे स्कूलमध्ये प्रदर्शन, मजेशीर शिक्षण पद्धती, बांबू पासून व माती पासून विविध वस्तूंची निर्मिती, गणित प्रदर्शनी, विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता व शारीरिक क्षमतेचा विकास होण्यासाठी विविध क्रीडांच्या आयोजन करण्यात आले तसेच सांस्कृतिक नृत्य सादर करण्यात आले, विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जागृती व्हावी व झाडांचे मूल्य समजावे व त्यांची संगोपन करण्याची भूमिका अंगीकृत व्हावी यासाठी इको क्लब द्वारे मिरवणूक काढण्यात आली व पालक, विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार देण्यात आला असे विविध उपक्रम या सप्ताह अंतर्गत स्कूलमध्ये राबवण्यात आले होते.
हा शिक्षण सप्ताह यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रवीण घोंगडे सर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक प्रयत्न केले व सर्वांच्या प्रयत्नातून शिक्षण सप्ताह यशस्वीरित्या संपन्न झाला.