Wednesday, November 13, 2024
HomeदेशDr.Babasaheb Ambedkar Death Anniversary | राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पीएम मोदी यांच्यासह या...

Dr.Babasaheb Ambedkar Death Anniversary | राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पीएम मोदी यांच्यासह या नेत्यांनी वाहिली आदरांजली…

Dr.Babasaheb Ambedkar Death Anniversary : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंगळवारी त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त संसदेत डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. “राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बाबासाहेब डॉ. बी. आर. आंबेडकर यांना त्यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नवी दिल्लीतील संसद भवन लॉनमध्ये पुष्पांजली अर्पण केली,” असे राष्ट्रपती भवनाने ट्विट केले.

राष्ट्रपती मुर्मू यांच्यासमवेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि इतर नेते आणि मान्यवर संसद संकुलात होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी 66 व्या ‘महापरिनिर्वाण दिना’निमित्त राष्ट्रीय राजधानीतील संसद भवन संकुलात बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली.

पीएम मोदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “महापरिनिर्वाण दिनानिमित्त मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहतो आणि त्यांच्या देशासाठी केलेल्या अनुकरणीय सेवेचे स्मरण करतो. त्यांच्या संघर्षाने लाखो लोकांना आशा दिली आणि भारताला असे सर्वसमावेशक संविधान देण्याचा त्यांचा प्रयत्न कधीही विसरता येणार नाही.

भाजप-काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांनीही श्रद्धांजली वाहिली
डॉ भीमराव आंबेडकर यांच्या ६६ व्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवारी राष्ट्रपती, पंतप्रधान, उपराष्ट्रपती, लोकसभा अध्यक्ष, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी अध्यक्षा सोनिया गांधी, भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांना आदरांजली वाहिली.

लखनौमध्ये, यूपीच्या माजी मुख्यमंत्री आणि बसपा प्रमुख मायावती यांनीही भारताच्या संविधानाचे शिल्पकार बीआर आंबेडकर यांना श्रद्धांजली वाहिली. यासोबतच त्यांनी बसपा संस्थापक कांशीराम यांनाही श्रद्धांजली वाहिली.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: