जागेश्वर विद्यालयात संदीप पाटील यांच्याकडून व्याख्यानाचे आयोजन….विद्यार्थी पालक झाले भावूक.
बाळापूर – सुधीर कांबेक
आई-वडिलांची काळजी घ्या; त्यांचा आदर करा. वेळ निघून गेल्यावर उपयोग होत नाही. ज्या आई-वडिलांनी २० वर्षे मुलींचा सांभाळ केला त्या मुली दोन दिवसांच्या प्रेमाखातर आई-वडिलांना विसरून जातात. आई-वडिलांना विसरू नका. जीवनात आई-वडिलांचे महत्त्व अनन्यसाधारण असते, अनाथांकडून जाणून घ्या,’ असे प्रतिपादन व्याख्याते व प्रबोधनकार प्रा. वसंत हंकारे यांनी येथे केले.ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष उपमुख्यमंञि अजितदादा पवार यांच्या वाढदिवसनिमित्य राष्ट्रवादीचे संदीप पाटील यांनी आयोजित केलेल्या अजितपर्व सप्तांहनिमित्य दमलेले आई-बाप’ या विषयावरील व्याख्यानात वाडेगाव येथील जागेश्वर विद्यालय येथे बोलत होते.
वसंत हंकारे यांनी सामाजिक व ऐतिहासिक उदाहरणे देऊन आई-वडिलांचे महत्त्व, सोशल मीडियाचा सदुपयोग कसा करावा, मोबाइलचा दुरुपयोग कसा टाळावा, या संदर्भात प्रबोधन केले. त्यांचे व्याख्यान ऐकून उपस्थित तरुण-तरुणी भावूक झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जागेश्वर विद्यालय वाडेगाव चे अध्यक्ष संतोष मानकर हे होते. कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेसचे अकोला लोकसभा समन्वयक संदीप पाटील यांनी केले होते. यावेळी प्रवीण भोटकर पत्रकार रमेश ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
आई-वडिल व शिक्षक हे दैवत असून, सर्व समाजात प्रबोधन व्हावे. जीवनामध्ये संस्कार महत्त्वाचे असून, त्यातून परिवर्तन होण्याची गरज आहे. आई-वडिलांचा संघर्ष, कष्ट याची जाण असली पाहिजे, असेही ते म्हणाले. १४ वर्षांची मुलगी आई-वडिलांना सोडून अनोळखी व्यक्तीसोबत जाते; तेव्हा त्या बापाला काय वाटत असेल? तुमचं १४ वर्षांचे वय हे विवाह करण्याचं आहे काय? नंतर पोलिस स्टेशनमध्ये आल्यानंतर मुलगी आई-वडिलांना ओळखत नाही, असे म्हणत प्रा. हंकारे यांनी वाडेगाव येथील जागेश्वर विद्यालयात आयोजित ‘दमलेले आई-बाप’ या व्याख्यानानंतर विद्यार्थ्यांमध्ये जाऊन संवाद साधला.
अन् मुली गहिवरल्या – मुला-मुलींनी क्षणिक प्रलोभनाला बळी न पडता शैक्षणिक पात्रता, आर्थिक क्षमता निर्माण करून एकमेकांच्या कुटुंबातील संमतीने लग्न करावे, असे व्याख्याते वसंत हंकारे म्हणाले. विविध क्षेत्रातील उदाहरणे देत प्रारंभी विनोदनंतर भावनिक होऊन त्यांनी उपस्थित महिला, मुली व पालक यांच्या काळजाचा ठाव घेत बाप समजून घेताना विचार मांडले. बापाविषयीचा जिव्हाळा सांगताना मुलींना रडू कोसळले. आई-वडिलांचं नातं निष्ठेने जपावं, असे आवाहन त्यांनी तरुणाईला केले.यावेळी कार्यक्रम विद्यालयांतील शिक्षकवृंद व पालक मोठ्या संख्येने उपस्थीत होते.