Monday, December 23, 2024
Homeराजकीयमहापुरुषांच्या पुतळ्यांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही बसवण्यात यावेत यासाठी महापालिकेवर दलित महासंघाचा गाढव मोर्चा...

महापुरुषांच्या पुतळ्यांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही बसवण्यात यावेत यासाठी महापालिकेवर दलित महासंघाचा गाढव मोर्चा…

सांगली – ज्योती मोरे

नुकताच साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यावर रंग टाकण्याचा प्रकार घडला होता. त्यामुळे सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील बहुजन महापुरुषांच्या पुतळ्यांची सुरक्षितता धोक्यात आली आहे.

आज दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष उत्तम मोहिते यांनी अशा महापुरुषांच्या पुतळा परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत,या मागणीसाठी महापालिकेवर गाढव मोर्चा काढला होता. यावेळी जिल्हाध्यक्ष वनिताताई कांबळे, जिल्हा संपर्कप्रमुख महेश देवकुळे, जिल्हा उपाध्यक्ष अजितराव आवळे, मिरज तालुका अध्यक्ष सचिन मोरे, महावीर चंदनशिवे, प्रवीण वारे, तेजस मोरे, आदी मान्यवर सहभागी झाले होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: