Monday, December 23, 2024
Homeराज्यवाडेगावतील उगले कुटूंबियाकडून समाजासाठी 'शव पेटी' दान...

वाडेगावतील उगले कुटूंबियाकडून समाजासाठी ‘शव पेटी’ दान…

वर्षंश्राद्ध रद्द करून त्याचा खर्च शव पेटीला

पातूर – निशांत गवई

दिवसेंदिवस ग्रामस्थांमध्ये आजार वाढत आहे त्यामुळे अनेकांची मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले. काहींचे मृतदेह रात्रभर ठेवण्याचे प्रमाण वाढले त्या मृतदेह खराब होऊ नये म्हणून बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील स्व.रमेश पंढरी उगले यांचे मागील वर्षात जानेवारी २०२२ ला निधन झाले असता आता नुकताच त्यांचा प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रम अवाढव्य खर्च न करता अगदी साध्या पद्धतीने करण्यात येत आहे.

समाजातील अनिष्ट प्रथांना जुगारून कार्यक्रम एकदम सरळ साध्या पद्धतीने करून सुयोग रमेश उगले यांनी समाजासाठी उपयोगात येणारी शवपेटी दान देण्याचा निर्णय घेतला आहे.
माणसाच्या मरणोत्तर अंतिम काळात अनेक अडचणी कुटुंबासमोर असतात. खुप लोकांची मुले, मुली बाहेरगावी , विदेशात असतात. अश्या परिस्थितीत व्यक्तीचे ‘ (शव) ‘मृतदेह ठेवण्याची मोठी अडचण कुटुंबासमोर असते.

ही समस्यां गावतील युवक सुयोग उगले यांनी शवपेटी दान करण्याचा एक समाजउपयोगी निर्णय घेतला आहे. आई श्रीमती कल्पना रमेश उगले यांच्या विशेष भावनिक पुढाकारतून तसेच प्रणिती रमेश उगले (राऊत), सौ.श्रुतिका रमेश उगले (खरड) तसेच चि. प्रज्योत रमेश उगले या कुटुंबाने पुढाकार घेत ‘शवपेटी’ दान करण्याचा निर्णय घेतला आहे.

यामुळे संबंधित कुटुंबाला अंतिम दुःखात आधार होईल . हा निर्णय घेताना नंदकिशोर वाकोडे, अश्विन कंडारकर , मोहन फाळके , राजेश पळसकार , गजानन चोपडे, महेंद्र पाटीलखेडे ,रामेश्वर म्हैसने,गोपाल जवंजाळ, नारायण मानकर, राम लिपते ,करण लोध,साईकिरण पोटदुखे , यांनी वैचारिक समर्थन दिले.ही शवपेटी दान देत असल्याने परिसरात कौतुक होत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: