सांगली – ज्योती मोरे
शहरात वेगवेगळे उत्सव, कार्यक्रम, मिरवणूक या वेळेस दरम्यान डॉल्बी आणि लेझर दिव्यांचा वापर होत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका उत्पन्न झालेला दिसून येत आहे काही जणांचे कान काहीजणांचे डोळे तर सांगली जिल्ह्यात दोन लोकांना प्राण देखील गमावले लागले आहेत.
यावर्षीच्या गणेशोत्सवामध्ये डॉल्बीच्या कर्ण कर्कश्य आवाज आणि लेझर दिव्यांचे प्रमाण खूपच वाढले होते. त्यामुळे मिरजेच्या नागरिकांनी डॉल्बी आणि लेझर मुक्त अभियानासाठी उत्स्फूर्त बैठक घेतली आणि त्या बैठकीत शहर पूर्णपणे डॉल्बी आणि लेझर मुक्त करण्याचे ठरवले
त्याचे पुढचे पाऊल म्हणून आज रोजी सांगली जिल्ह्याचे पालक मंत्री तथा कामगार मंत्री नामदार सुरेश भाऊ खाडे यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली आणि या संदर्भात लक्ष देण्याची मागणी करण्यात आली.
निवेदनात म्हणले आहे की या वर्षीच्या गणेश विसर्जन मिरवणुकीतील डॉल्बी आणि लेसर क्या अति प्रमाणामुळे मिरज शहरातील अनेक लोकांना डोळ्यांचे आजार निर्माण झाले आहेत तर काहीजणांना अंधत्व सुद्धा आलेले आहे अशी बातमी आहे.
तसेच डॉल्बीच्या आवाजामुळे नागरिक त्रस्त झाले असून इथून पुढे शहरात या संदर्भात कठोर पावले उचलावीत. त्याचबरोबर गणेश उत्सवाच्या काळात गणेशोत्सव आणि इतर हिंदू सणांच्या काळामध्ये देव देवतांसमोर होणारा हिडीस प्रकार थांबवून उत्सव पवित्रतेने साजरी व्हावेत.
मशिदीवर लावण्यात आलेले लाऊड स्पीकर यांचे आवाज पुन्हा वाढले असल्यामुळे असे बेकादेशीर भोंगे बंद व्हावेत.
मिरज शहरात गणेश विसर्जनाची आणि देखाव्यांची मोठी परंपरा आहे म्हणून पारंपरिक वाद्यांना आवाजाची मर्यादा राखून रात्रभर परवानगी देण्यासाठी प्रयत्न व्हावेत.
याबाबत श्री पालकमंत्री यांनी सांगितले की कायद्याच्या आणि सुप्रीम कोर्टाच्या चाकोरीबाहेर कोणी काही करणार नाही याची दक्षता घेतली जाईल. जर असे प्रकार घडत असतील तर यासाठी जनजागृती होणे आवश्यक आहे. तसेच याबाबत तज्ञांचे मार्गदर्शन घेऊन याबाबत निर्णय घेईन.
यावेळी ओमकार शुक्ल, मोहन वाटवे,किशोर पटवर्धन, विराज कोकणे, मिलिंद जाधव, प्रशांत गोखले, सुधीर गोरे, गिरीश भट ,श्रीपाद भट, राजाभाऊ जोशी, प्राध्यापक रवींद्र फडके, एडवोकेट अजिंक्य कुलकर्णी, मिलिंद भिडे, नंदकुमार कोरे उपस्थित होते