सध्या कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीत नेते खूप पैसा खर्च करत आहेत. आचारसंहिता लागू होऊनही नेते आपल्या कारवाया सुरूच ठेवत आहेत. जणू पैशाच्या जोरावर निवडणूक जिंकण्याची शर्यत सुरू आहे. मात्र, निवडणूक आयोग उमेदवारांवर करडी नजर ठेवून धाड टाकत आहे. बुधवारी आयकर (आयटी) विभागाने काँग्रेस उमेदवाराच्या भावाच्या घरावर छापा टाकून एक कोटी रुपयांची रोकड जप्त केली. तेही अंगणात असलेल्या झाडातून…
एजन्सीच्या वृत्तानुसार, आयकर अधिकारी सुब्रमण्यम राय यांच्या घरी पोहोचले आणि त्यांनी त्यांच्या बागेत लावलेले झाड पाहिले. यामध्ये दाट फांद्यांच्या मध्ये एक पेटी ठेवलेली दिसते. अधिकारी घरातील महिलांना विचारल असता हे काय आहे? हे रोख आहे का? हे इथे कोणी ठेवले?
अधिकारी म्हणतात मॅडम आम्ही प्रश्न विचारतो, तुम्ही उत्तर द्या. यावर एका महिलेने उत्तर दिले की ते मी ठेवले आहे. अधिकारी विचारतात की ते इथे ठेवायला कोणी दिले आणि काय सूचना दिल्या? यावर महिला उत्तर देण्यापूर्वीच व्हिडिओ संपतो. खाली Video पाहा