सांगली – ज्योती मोरे
सुरज फाउंडेशन संचलित नवकृष्णा व्हॅली मराठी माध्यम व इंग्रजी माध्यम विजयनगर म्हैसाळ स्टेशन मध्ये आज दिनांक 1 जुलै 2023 वार शनिवार रोजी डॉक्टर्स डे व महाराष्ट्र कृषी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमां साठी लाभलेले प्रमुख पाहुणे सन्माननीय डॉक्टर दिपक रामगोंडा पाटील यांचे टाळ्यांच्या गजरात आगमन झाले.
प्रमुख पाहुण्यांचा परिचय इंग्रजी माध्यमाचे मुख्याध्यापक अस्लम सनदी सर यांनी करून दिली. तसेच प्रमुख पाहुण्यांचा सत्कार मराठी माध्यमचे मुख्याध्यापक श्री सुनील चौगुले सर यांच्या हस्ते करण्यात आला.
सन्माननीय डॉ. दिपक पाटील सरांनी शाळेतील मुलांना आरोग्य विषयी व त्याचबरोबर पोषक आहाराबद्दल माहिती दिली. तसेच त्यांनी चांगल्या सवयी कोणत्या आहेत याविषयी माहिती सांगितली . आज १ जुलै महाराष्ट्र कृषी दिन महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त आजचा हा कृषी दिन साजरा केला जातो.
शेतकरी हा संपूर्ण जगाचा अन्नदाता आहे आणि त्या काळात शेतकर्याच्या अडचणी ह्या शेतकर्याच्या बांधावर जावून सोडविल्या जायच्या म्हणून त्यांना शेतकर्याचा जाणता राजा म्हणून ओळखले जात असे त्याचबरोबर शेतकर्यांची मुले कारखानदार व कलेक्टर व्हावी अशी त्यांची इच्छा होती. शेतकर्यावर जीवापाड प्रेम करणारे अशी व्यक्ती म्हणजे वसंतराव नाईक होते.
म्हणून हा दिवस महाराष्ट्र कृषी दिन म्हणून साजरा केला जातो अशी माहिती मराठी माध्यम चे मुख्याध्यापक सुनिल चौगुले सर यांनी मुलांना सांगितली. स्वागत व प्रास्ताविक इंग्रजी माध्यम चे मुख्याध्यापक अस्लम सनदी सर यांनी केले व सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ. बबीता कांबळे मॅडम यांनी केले.
यावेळी कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षक नितीन बनसोडे सर, सौ मेघा मगदूम मॅडम, स्वाती माळी मॅडम , कु. धनश्री शेटे मॅडम, सौ. तनुजा पाटील मॅडम ,धनश्री जोशी मॅडम, सौ. गीतांजली पाटील मॅडम तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी सुरज फाउंडेशनचे संस्थापक मा. प्रवीणशेट लुंकड सर , सेक्रेटरी माननीय श्री. एन.जी कामत सर , माननीय सौ संगीता पागनीस मॅडम, कुपवाड मराठी माध्यम मुख्याध्यापक श्री अधिकराव पवार सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.