Saturday, September 21, 2024
Homeकृषीआता शेती कराव की वाघोबाच्या भितीने घरी दडाव…देवलापार परीसरातील शेतकऱ्यांनी फोडला टाहो...

आता शेती कराव की वाघोबाच्या भितीने घरी दडाव…देवलापार परीसरातील शेतकऱ्यांनी फोडला टाहो…

  • पत्रपरिषदेत कृ.उ.बा.स. सभापती सचिन किरपान यांचे वनविभागाला अल्टीमेटम…

रामटेक – राजु कापसे

जिल्ह्यातील रामटेक तालुका व पारशिवनी तालुक्यात वाघांच्या हल्ल्याचा घटना मागील काही महिन्यापासून सतत सुरु असुन मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यात १० ते १२ शेतकऱ्यांसह शेकडो पाळीव जनावरांचा जिव गेलेला आहे. रामटेक तालुक्यातील नवेगाव वडंबा भागात शुक्रवार २१ जून २०२४ रोजी धनराज मणिराम नैताम या गुराख्यावर पट्टेदार वाघाने हल्ला करीत त्याला ठार केल्याची भयावह घटना घडली, ते पाऊस येत असल्याने छत्री घेऊन उभे होते.

तेव्हाच मागून आलेल्या पट्टेदार वाघाने त्यांच्यावर जोरदार झडप मारली. याच वाघाने यापूर्वीही हल्ले करून दोन लोकांना ठार मारले आहे. हा वाघ आता मानवी रक्तासाठी आसुसलेला आहे. यामुळे हा वाघ देवलापार परिसरातील जंगलात ठेवणे धोक्याचे होईल. याच कारणाने त्याला तातडीने पकडून सुरक्षित स्थळी नेण्याची योजना वन विभागाने आखली आहे. त्यानुसार वन विभागाने संबंधित वाघाला पकडण्याची तयारी सुरू केली आहे.

आदिवासी देवलापार क्षेत्र जंगल व्याप्त आहे. या भागात वाघांची संख्या लक्षणीय आहे. देश विदेशातून या भागात जंगल सफारी करिता पर्यटक येतात. या भागात गुरांढोरांवर हल्ले ही तर मोठी बाब नाही परंतु मनुष्यावरही अलीकडे वाघांसह इतर वन्यप्राण्यांचे हल्ले वाढलेले आहे.

तेव्हा आता शेती कराव की वाघोबाच्या भितीने घरी दडाव असा संतप्त सवाल या भागातील नागरिक करीत आहे.या परिसरात जंगल सफारीचे सिल्लारी, चोरबाहुली, खुर्सापार तर आता नव्यानेच मोगरकसा गेट सुरू करण्यात आलेले आहे. या गेटवर सप्टेंबर ते जून जंगल सफारी सुरू असते. मोठ्या प्रमाणात येथे सफारीकरिता देश विदेशातून पर्यटक येतात. जंगलातील या सर्व प्रकाराने भयभीत होऊन तसेच त्या प्राण्यांना पुरेसे अन्न, शिकारी जंगलात मिळत नाही त्यामुळे त्यांनी आपला मोर्चा गावाकडे वळविला आहे.

हिंसक प्राणी व वाघांना जंगलात पुरेसी शिकार मिळत नसल्याने गावाकडे येऊन जास्त धावता न येणाऱ्या गाई, म्हैसीची शिकार करीत आहे. जंगलात किंवा गावानजीक चरायला गेलेल्या पाळीव प्राण्यांवर हल्ला चढवीत आहे. पाळीव प्राण्यांना चारायला गुराखी किंवा शेतकरी असतो त्यामुळे त्याला शिकार करता येण्यास व्यत्यय निर्माण होत असल्याने तो त्या व्यक्तीवरच हल्ला चढवीत आहे. त्यामुळे या भागातील अनेकांच्या जिवावर बेतले जात आहे. परंतु या सर्व बाबींना जबाबदार कोण हा प्रश्न निर्माण होत आहे. आतापर्यंत सात विविध विभागात सहा घटना घडल्या आहे. ही अत्यंत खेदाची बाब आहे.

जंगलाला काटेरी कुंपण घालणे अतिआवश्यक आहे. यामुळे वन्यप्राणी गाववस्तीत व गुराखीसह त्याचे पाळीव जनावरे जंगलात शिरणार नाही. मात्र करेल कोण ? अंत्री मंत्री संत्री येतात अन् कुंपणाबाबद केवळ कोरडे आश्वासन देऊन निघुन जातात. त्यामुळे हिंस्त्र प्राण्यांचे माणवावर व त्याच्या पाळीव जनावरांवर हल्ले सातत्याने सुरूच आहे. २१ जुनच्या घटनेनंतर गोंडवाना गणतंत्र पार्टीने जोरदार आंदोलन केले.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: