Monday, December 23, 2024
HomeदेशDMK च्या आमदाराने जड बस चालवायला घेतली…अगोदर विजेच्या खांबाला धडकली नंतर खड्यात...

DMK च्या आमदाराने जड बस चालवायला घेतली…अगोदर विजेच्या खांबाला धडकली नंतर खड्यात घातली…पाहा व्हिडिओ

तामिळनाडूतील कांचीपुरममध्ये एका आमदाराला बस चालवणे चांगलाच अंगलट आले आहे. DMK आमदार सीव्हीएमपी एझिलारासन यांनी बुधवारी 05 एप्रिल रोजी त्यांच्या मतदारसंघात नवीन बस मार्गाचे उद्घाटन केले. यावेळी आमदारांनी सरकारी बसला हिरवी झेंडी दाखवून ती चालवण्याचा प्रयत्न केला. मात्र बस थोडी अंतरावर जाताच विजेच्या खांबाला धडकली नंतर बस खड्यात घातली.

कांचीपुरमचे खासदार सेल्वम आणि कांचीपुरम मतदारसंघातील द्रमुकचे आमदार एहिलरसन यांनी बस चालवण्यापूर्वी पूजा केली, त्यानंतरहिरवी झेंडी दाखवून बससेवेचे उद्घाटन केले. त्यानंतर पक्षाचे सदस्य बसमध्ये चढले आणि आमरा आमदार एहिलरसन यांनी बस काही अंतरावर नेली. माजी मुख्यमंत्री करुणानिधी, विद्यमान मुख्यमंत्री स्टॅलिन आणि क्रीडा मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांची छायाचित्रे बसवर लावण्यात आली होती.

या प्रयत्नात आमदार इझीलरासन अयशस्वी ठरले आणि काही वेळातच बसवरील नियंत्रण सुटले. आधी त्यांनी रस्त्याच्या कडेला द्रमुकचा झेंडा चिरडला, त्यानंतर बस खोल खड्ड्यात पडली आणि बस त्यात अडकली आणि कलंडली. बसमध्ये विजेचा खांब असल्याने द्रमुकचे कार्यकर्ते आणि बसमध्ये बसलेल्या इतर लोकांना बाहेर काढावे लागले.

बस खड्ड्यात अडकल्यानंतर प्रथम आमदारांना बसमधून उतरवण्यात आले. सोबतच आमदार ड्रायव्हिंग सीटवरून हसत खाली उतरले. त्याचवेळी बसमध्ये चढणाऱ्या लोकांनाही खाली उतरण्यास सांगण्यात आले. त्यानंतर अनेकांनी रिकाम्या बसला ढकलले, त्यानंतर बऱ्याच प्रयत्नानंतर ही बस तिथून हटवण्यात आली. या अपघातात बसच्या पुढील भागाचे नुकसान झाले आहे. बस बाहेर काढल्यावर त्या बसचा खरा ड्रायव्हर त्याच्या सीटवर बसून बस घेऊन गेला.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: