Sunday, December 22, 2024
Homeगुन्हेगारीडीजे मालकाची भोसकुन हत्या, आरोपींचा शोध सुरू, कन्हान - बोर्डा मार्गावरील घटना...

डीजे मालकाची भोसकुन हत्या, आरोपींचा शोध सुरू, कन्हान – बोर्डा मार्गावरील घटना…

नागपूर – शरद नागदेवे

कल्पेश भागवत बावनकुळे (रा.बनपुरी साटक ,ता.पारशिवनी) असे मुतकाचे नाव आहे.कल्पेश डीजेचा व्यवसाय करत होता.त्याने शनिवारी नागपूर शहरातील आर्डर पुर्ण केल्यानंतर सुरज ढोबळे व जितेंद्र ढोबळे याच्य सोबत एमएच ४९/बीएएल५६२८ क्रमांकाचा अॅक्टिव्हाने कन्हान मार्गे बनपुरीला जात होता. तीघेही कन्हान -बोर्डा मार्गावरील एका पेट्रोलपंप जवळ पोहचताच मोटरसायकल वर आलेल्या अनोळखी दोघांनी त्या तिघांना अडवले त्यामुळे तिघई रोडवर कोसळले.

त्या दोघांनी काही कळण्याचा आत कल्पेशला पकडून त्याचावर धारदार शस्त्राने वार करायला सुरुवात केली.भीतीमुळे सुरज व जितेंद्रने अॅक्टिव्हा सोडुन तीथुन लगेच पळ काढला.तो खाली कोसळताच दोघे पळून गेले.यात गंभीर व खोलवर जखमा झाल्याने कल्पेशचा घटनास्थळी मुत्यू झाला.

माहिती मीळताच पोलीसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मुतदेह उत्तरीय तपासणीसाठी कामठी शहरातील उपजिल्हा रुग्णालयात पाठवीला.याप्रकरणी कन्हान पोलीसांनी भादंवी ३०२ अन्वये गुन्हा नोदंवीला असुन,तपास सहायक पोलीस निरीक्षक सतीश मेश्राम करीत आहेत.कल्पेशवर हल्ला करणारे दोघेही नमके कोन होते आणि त्याने त्याचा खून का केला.हे अद्याप स्पष्ट झाले नाही.उपविभागीय पोलीस अधिकारी व ठाणेदार यांनी घटनास्थळी पाहणी केली.

आरोपींचा शोधिसाठी श्वानपथकाचीही मदत घेण्यात आली होती; परंतु ठोस सुगावाच मीळालाच नाही.मारेकऱ्यांना कल्पेशसोबत असलेले त्याचे दोन मीत्र सुध्दा ओळखत नाही.त्याचा खुन व्यावसायिक वादातुन झाल्याचा प्राथमिक अंदाज ठाणेदार विलास काळे यांनी व्यक्त केला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: