अकोला – वाटेतील मोठमोठे दगड, चिंचोळ्या वाटा,तीव्र चढ उतार,लोखंडी शिडी मार्ग पार करत दिव्यांग रविन्द्र भवाने दिव्य कामगिरी केल्याने सर्व स्तरातून त्यांच्या चिकाटी,साहस, आणि धाडसाचे कौतुक होत आहे.
शिवुर्जा प्रतिष्ठान, शिवाजी गाडे, पैठण यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील दिव्यांगांसाठी कळसुआई शिखर मोहिमेचे आयोजन दरवर्षी नव वर्ष दिनी करीत असते.
यावर्षीच्या मोहिमेत अकोला जिल्ह्यातील दिव्यांग रविन्द्र भवाने यांनी सहभाग घेऊन कठीण समजल्या जाणाऱ्या,चढतांना उतरतांना धडधाकट लोकांना ही धडकी भरावी अशा महाराष्ट्रांतील सह्याद्रीतील कळसुबाई शिखर सर करत इतरांना प्रेरणादायी कार्य केले,
श्री भवाने यांनी मागील वर्षी सुदधा असाच अयशस्वी प्रयत्न केला होता, परंतु या वर्षी पुन्हा चिकाटी, सातत्य ठेवत त्यांनी हा टप्पा पार केला. या मोहीमेत त्यांचे मित्र श्री प्रशांत सोळंके यांनी खूप मोलाची मदत केली, तसेच श्री शिवाजी गाडे,प्रसिद्ध गिर्यारोहक श्री रवि मांजरे व श्री विशाल रावत यांनी या मोहिमेसाठी त्यांना सदैव प्रेरित केले आहे.