पिकाची पाहनी करून शेतकऱ्यासोबत चर्चा
पातूर – निशांत गवई
कृषी विभाग अंतर्गत येत असलेल्या परिसरात ९ व१० एप्रिल रोजी झालेल्या अवकाळी पावसाने प्रचंड प्रमाणात शेतकऱ्याच्या पिकाचे नुकसान झाल्याने शेतकरी हातबल झाला होता .याबाबतचे लोकमत वृत्त प्रकाशित करताचे पुणे येथील पुणे विभागाच्या कृषी संचालक आयुक्त यांनी बेलूरा या गावात सोमवार रोजी सायंकाळी ६ वाजता दरम्यान पिकाची पाहणी करून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या व शेतकऱ्यांसोबत झालेल्या पीक नुकसान बाबत चर्चा केली.
कांदा पिकाची व कांदा बियाची कोणतीही पाहणी केली असून कोणत्या काम पडणार नाही,असे शेतकऱ्यांना सांगितलं आहे. यावेळी विभागीय कृषी संचालक गुण नियंत्रण कृषी आयुक्तांलय पुणे चे सुनील बोरकर,व त्यांचे पथक तसेच तालुका कृषी अधिकारी धांनजय शेट्टे, इंद्रायणी थोरात मंडळ कृषी अधिकारी, कृषी सहायक बी आर इंगळे, एस आर खंडारे, विनोद देवकर, ए पी ईडोळे, आदी प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.तसेच गावतील शेतकरी राजेंद्र देशमुख,मनोहर डांगे, निलेश पटेखेड, सरपंच धम्मापाल इंगळे,दिपक दाबेरव, पुडीलक डांगे,समाधान काळे रामदास लोखंडे, शशी डांगे, यांची उपस्थिती होते..