Monday, December 23, 2024
Homeराज्यजिल्हा युवा पुरस्कार : २९ जुलैपर्यंत अर्ज मागविले...

जिल्हा युवा पुरस्कार : २९ जुलैपर्यंत अर्ज मागविले…

अमरावती – दुर्वास रोकडे

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर विविध विषयांत युवकांनी पार पाडलेल्या भुमिका, दिलेले योगदान यामुळे युवांची एक अद्वितीय ओळख समाजात झालेली आहे. युवाचा समाजातील अविभाज्य घटक या नात्याने विकास प्रक्रीयेत सहभाग आवश्यक झालेला आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे युवा धोरण 2012 नुसार राज्य व जिल्हास्तरवर एक युवक, युवती व एक संस्था याप्रमाणे स्वतंत्र पुरस्कार देण्याबाबत सन 2021-22,2022-23 व 2023-24 साठी प्रस्ताव मागविण्यात येत आहे. प्रत्येक वर्षाचे प्रस्ताव दि. 29 जुलैपर्यंत स्वतंत्र सादर करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे.

पुरस्कारचे स्वरुप : जिल्हा युवा पुरस्कारासाठी जिल्हास्तर एक युवक, एक युवती तसेच एक नोंदणीकृत संस्था यांना देण्यात येईल सदरचा पुरस्कार गौरव पत्र, सन्मान चिन्ह, रोख रक्कम 10 हजार रूपये (प्रतियुवक व युवतीस्गठी, प्रति संस्थेसाठी गैरव नत्र, सन्मान चिन्ह, रोख रक्कम 50 हजार अशा स्वरुपात असेल.)

अ. युवक युवतीसाठी पात्रता निकष : 1. अर्जदार युवक युवतींचे वय पुरस्कार वर्षातील 1 एप्रिल रोजी 15 वर्ष पूर्ण व 31 मार्च रोजी 29 वर्ष पर्यंत असावे. जिल्हास्तर पुरस्कारासाठी जिल्ह्यात सलग पाच वर्ष वास्तव्य पुरस्कार व्यक्ती अथवा संस्थेस विभागुन दिला जाणार नाही. पुरस्कार मरणोत्तर जाहिर करण्यात येणार नाही. केलेल्या कार्याचे सबब पुरावे अर्जासोवत जोडणे आवश्यक राहील.

(उदा. वृत्तपत्रीय कात्रणे, प्रशस्ती, चित्रफिती व फोटो इत्यादी) अर्जदार युवक युवतीने पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर किमान दोन वर्षे क्रीयाशिल कार्यरत रहाणार असल्याचे हमीपत्र देणे आवश्यक राहील. अर्जदार व्यक्तीचे कार्य हे स्वयंपुर्तीने केलेले असावे. एका जिल्ह्यात पुरस्कार प्राप्त करणारी व्यक्ती राज्यातील अन्य जिल्ह्यात जिल्हा युवा पुरस्कारासाठी अर्ज करण्यास पात्र राहणार नाही. केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय व निमशासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी पुरस्कारासाठी पात्र राहणार नाही.

ब. संस्थासाठी पात्रता निकष : पुरस्कार संस्थेस विभागुन दिला जाणार नाही. संस्थानी केलेल्या कार्याचे सबब पुरावे अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील. (उदा. वृत्तपत्रीय कात्रणे, प्रशस्तीपत्रे, चित्रफीती व फोटो इत्यादी) अर्जदार संस्थेने पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर किमान दोन वर्षे क्रीयाशिल कार्यरत राहणार असल्याचे हमीपत्र देणे आवश्यक राहील. अर्जदार संस्था, सार्वजनिक विश्वस्थ अधिनियम 1860 किंवा मुंबई पब्लीक ट्रस्ट अॅक्ट 1950 नुसार पंजीवध्द असावी.

अर्जदार संस्था नोंदणी झाल्यानंतर किमान पाच वर्ष कार्यरत असणे आवश्यक आहे. अर्जदार संस्थेचे कार्य हे स्वयंपुर्तीने केलेली असावे. एका जिल्ह्यात पुरस्कार प्राप्त करणारी संस्था राज्यातील अन्य जिल्ह्यात जिल्हा युवा पुरस्कारसाठी अर्ज करण्यास पात्र राहणार नाही. अर्जदार संस्थेच्या सदस्यांचा पोलीस विभागाने प्रमाणीत केलेला चारित्र्य दाखला (संबंधीत परिक्षेत्रातील पोलीस स्टेशन) देणे आवश्यक राहील.

पुरस्कारासाठी मुल्यांकन : युवा व युवा विकासाचे कार्य करणा-या संस्थांनी केलेले कार्य दि. 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीतील गत तिन वर्षाची केलेली कार्य, कामगीरी विचारात घेण्यात येईल. युवा अथवा नोंदणीकृत संस्थांनी ग्रामीण व शहरी भागात केलेले सामाजिक कार्य, राज्याचे साधन संपत्ती जतन व संवर्धन तसेच राष्ट्र उभारणीच्या विकासासाठी सहाय्यभुत ठरणारे कार्य, समाजातील दुर्बल घटक, अनुसुचित जाती, जमाती व जनजाती आदिवासी भाग इत्यादी बाबतचे कार्य, शिक्षण, प्रोढ शिक्षण, रोजगार, आरोग्य, पर्यावरण, सांस्कृती, कला, क्रीडा,

मनोरंजन, विज्ञान, तंत्रज्ञान, व्यवसाय, महिला सक्षमीकरण, भ्रूण, व्यसनमुक्ती तसेच युवांच्या सर्वांगीण विकासाठी केलेले कार्य, राष्ट्रीय एकात्मतेस प्रोत्सहान देणारे कार्य, नागरी गलीच्छ वस्ती सुधारणा, झोपडपट्टी, आपत्ती व्यवस्थापन तसेच स्थानिक समस्या, महिला सक्षमीकरण, साहस इत्यादी बाबतचे सर्व कार्यक्षेत्रात कार्य करणे आवश्यक आहे. जिल्हा, पुरस्कारासाठी युवक युवती व संस्थांना करावयाचे नमुना अर्ज अर्जदारांनी 29 जुलै, 2024 पुर्वी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अमरावती येथे कार्यालयीन वेळेत सादर करावा.

या पुरस्काराच्या माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अमरावती, जिल्हा क्रीडा संकुल, अमरावती मार्डी रोड, तपोवनगेट जवळ, अमरावती येथे कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष संपर्क साधावा.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: