सांगली – ज्योती मोरे
सांगली,मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी बेकायदेशीर रित्या बांधकामांना परवाने देण्याचं काम तत्कालीन आयुक्त नितीन कापडणीस यांच्या कार्यकाळात झाला असून,अशा बांधकामांसह परवान्यांची चौकशी करून संबंधित महापालिकेच्या जबाबदार अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा.
अशी मागणी सांगली जिल्हा संघर्ष समितीच्या वतीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आलीय.दरम्यान संबंधित विभागानी सदर अधिकाऱ्यांवर कारवाई न केल्यास येणाऱ्या काळात याबाबत हायकोर्टात जाणार असल्याचा इशाराही अध्यक्ष तानाजी रुईकर यांनी दिलाय. यावेळी आर्किटेक्ट रवींद्र चव्हाण, ऍड.ओकार वांगीकर, आसिफ मुजावर, सुनील गिड्डे, महेश जाधव, सागर शिंदे, संतोष शिंदे उपस्थित होते.