Monday, December 23, 2024
Homeखेळजिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत | संदेश विद्यालय अँड ज्युनि. कॉलेजला...

जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत | संदेश विद्यालय अँड ज्युनि. कॉलेजला…

१७ वर्षाखालील-मुली, १७ वर्षाखालील-मुले, १९ वर्षाखालील-मुले या गटांमध्ये पटकावले मुंबई उपनगर जिल्ह्याचे अजिंक्यपद

शाळेच्या तीनही संघांची, मुंबई विभागीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड…

धीरज घोलप

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे व मुंबई उपनगर जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या वतीने जिल्हास्तरीय आंतरशालेय कबड्डी स्पर्धांचे आयोजन घाटकोपर येथील माणेकलाल मैदान येथे करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये कुर्ला, अंधेरी व बोरीवली या तालुकास्तरीय स्पर्धांमध्ये प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त शाळांचे संघ सहभागी झाले होते.

कुर्ला तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावून कुर्ला तालुक्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ज्ञान प्रसारक शिक्षण संस्थेच्या शिक्षकमित्र प्राचार्य बाळासाहेब म्हात्रे शैक्षणिक संकुल, पार्कसाईट, विक्रोळी(पश्चिम) येथील संदेश विद्यालय अँड ज्युनि. कॉलेज ऑफ आर्टस्, कॉमर्स अँड सायन्सच्या कबड्डीपटूंनी या जिल्हास्तरीय स्पर्धेच्या १७ वर्षाखालील-मुली, १७ वर्षाखालील-मुले व १९ वर्षाखालील-मुले या तीन गटांमध्ये अजिंक्यपद पटकावून घवघवीत यश संपादित करून हॅट्रिक साधली. या तीनही संघांची मुंबई विभागीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारे सुयशप्राप्त विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणारे शाळेचे क्रीडा शिक्षक सुनील तांबे, शिवाजी कालेकर व प्रशिक्षक सचिन पाष्टे यांचे संस्थेच्या अध्यक्ष पुष्पलता बाळासाहेब म्हात्रे, संस्थेचे विश्वस्त व शाळेचे प्राचार्य राजेंद्र म्हात्रे आणि संस्थेच्या विश्वस्त मेघा म्हात्रे यांनी अभिनंदन केले असून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: