सांगली – ज्योती मोरे
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ख्रिश्चन धर्मगुरूं सह प्रार्थना स्थळांवर समाजकंटकांद्वारे हल्ले होत आहेत. त्यामुळे ख्रिश्चन समाज सध्या भयभीत झाला आहे.इलेक्ट्रॉनिक माध्यमांमधून ख्रिश्चन समाजाविषयी आणि धर्मगुरूंविषयी खोट्याअफवा पसरवल्या जात आहेत.
या साऱ्या घटनांसह तेलंगणातील आमदार टी राजासिंह यांनी पैगंबरा बद्दल वादग्रस्त विधान केल्याच्या निषेधार्थ आज ख्रिश्चन कम्युनिटी असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन निषेध व्यक्त करण्यात आला. दरम्यान काही दिवसांपूर्वी बुलढाणा, मुंबई, औरंगाबाद आदि जिल्ह्यात ख्रिश्चन धर्मगुरुना टार्गेट करून धर्मांतराच्या खोट्या अफवा उठवून, खोट्या पोलीस केसेस दाखल करून मानसिक त्रास दिला गेला आहे.
सदर घटनांचा ख्रिश्चन कम्युनिटी असोसिएशनच्या वतीने जाहीर निषेध करीत सांगली जिल्ह्यातही ख्रिश्चन समाजातील धर्मगुरू आणि प्रार्थना स्थळांना सुरक्षितता पुरवण्यात यावी आणि धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करण्यात यावी. अशी विनंती यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यावेळी जिल्हाध्यक्ष पास्टर विजय वायदंडे, उपाध्यक्ष सचिन जाधव, उपाध्यक्ष सीमा मोरे, मिरज तालुका उपाध्यक्ष सुनील मोरे, मंगेश वाघमारे, रमेश रखवालदार, आकाश तिवडे,राजू मोरे, संतोष पावरे, संभाजी केचे, अनिल भोरे, रॉबर्ट कँलेब, विजय बेलारी, जैलाब शेख आदी मान्यवर उपस्थित होते.