Thursday, November 21, 2024
HomeMarathi News Todayआकोट रोटरीच्या वतीने आदिवासी मुलांना शालेय साहीत्य् तथा गणवेश वाटप...

आकोट रोटरीच्या वतीने आदिवासी मुलांना शालेय साहीत्य् तथा गणवेश वाटप…

आकोट शहरात अग्रगण्य सामाजीक संस्था म्हणुन मान्यताप्राप्त आकोट रोटरी क्लबने आदीवासी क्षेत्रातील धारगड – धारुळ येथील जि. प. मराठी शाळा केंद्र् बोर्डी ता. आकोट येथील १५० विदयार्थ्यांना त्यांच्या आवश्यकते नुसार शालेय साहीत्य् वहया, पुस्तके, कंपास इत्यादीचे रोटरीचे डिस्ट्रीक्ट् गर्व्हनर डॉ. आनंद झुनझुनवाला, प्रथम महिला मोनिका झुनझुनवाला तथा असिस्टंट गर्व्हनर अनिरुदध पालडिवाल हयांचे हस्ते वाटप करण्यात आले.

ह्या वेळी मंचावर रोटरीचे अध्यक्ष माधव काळे, सचिव नंदकिशोर शेगोकार उपस्थित होते.सर्व प्रथम शिक्षणाचे आराध्य् दैवत सावित्रीबाई फुले हयांचे प्रतिमेचे पुजन करुन कार्यक्रमाला सुरवात झाली. त्यांनतर पाहुण्यांचे स्वागत शाळांतील मुला / मुलीनी आदीवासी नृत्य् सादर करुन केले. हया वेळी महेश ड्रेसेस आकोट च्या वतीने विद्यार्थ्यांना नविन कपडयांचे वाटप करण्यात आले. मुलांना मिळालेल्या मदतीमुळे गावांतील सर्व लोकांनी

आंनद व्यक्त् केला. हयावेळी शाळा व्यवस्थापन अध्यक्ष हरिभाऊ मते, उपाध्यक्ष विनोद ठाकरे, सौ. रेखाताई बेठेकर, माजी उपसरपंच रामेश्वर करवते, माजी सरपंच जेष्ठ नागरिक केशवराव मते, धनराज कंकाळ, मुख्याध्यापक निवृत्ती राऊत, शिवशंकर खंडेराय, विनोद तळोकार, मनोज लोडम, मनीष ढोले, डॉ. श्याम केला उपस्थित होते. त्यासोबत अकोट रोटरीचे माजी अध्यक्ष प्रभाकरराव मानकर, विजय झुनझुनवाला, रवि मुंडगावकर, प्रमोद लहाने, शाम शर्मा, राजकुमार गांधी, उदधवराव गणगणे, संतोष इस्तापे, शिरीष पोटे, आय पि पि संजय बोरोडे, आनंद भोरे, शाम पिंपळे, दिपक कतोरे ई. सर्व सदस्य सपत्नीक उपस्थीत होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: