Tuesday, October 15, 2024
Homeराज्यमुलींना कब्बड्डी ट्रॅक सूट चे वाटप…समाजसेवक राहुल किरपान यांच्या मार्फत...

मुलींना कब्बड्डी ट्रॅक सूट चे वाटप…समाजसेवक राहुल किरपान यांच्या मार्फत…

रामटेक – राजू कापसे

रामटेक तालुक्यातील स्वामी सितारामदास महाराज विद्यालय शिवनी भोंडकी येथील १४ वर्षे वयोगटातील मुली च्या कबड्डी संघाने नागपूर जिल्हाचे प्रतिनिधित्व करीत वर्धा येते पार पडलेल्या कब्बड्डी सामन्यात विभागीय स्तरावर विजय प्राप्त केला असून पुणे येथे राज्यस्तरीय कब्बड्डी सामने खेळण्याची संधी प्राप्त केली आहे..

समाजसेवक राहुल भाऊ किरपान भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष रामटेक यांच्या मार्फत…या मुलींच्या संपूर्ण टीमला ट्रॅक सूट चे वाटप करण्यात आले.. पुणे येथे होण्याऱ्या राज्यस्तरीय सामन्या करिता विद्यार्थीनीना विजयी शुभेच्छा दिल्या.

यावेळी सागर भाऊ लोंढे, सहकारी मित्र रूपेश वनवे, सत्यप्रकाश हटवार, क्रिडां शिक्षक किशना पाटील,पोलीस पाटील गणेश बडवाईक, रतन मेहर, किशोर मेहर, अमोल वैद्य, चंद्रभान मेहर,संजय वैद्य, सचिन वैद्य,तसेच गावातील नागरिक उपस्तित होते..

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: