रामटेक – राजु कापसे
कामगार चळवळीतुन निर्माण झालेल्या हरिभाऊंनी राज्याचा मंत्री म्हणून सरकारमध्ये काम केले. वयाच्या ९४ वर्षा पर्यत ते कामगार चळवळीत सक्रीय होते. कामगार चळवळीत त्यांच्या सारखे नेतृत्वच मिळाले नसल्याची खंत माजी केंद्रीय राज्यमंत्री श्री विलास मुत्तेमवार यांनी व्यक्त केली.
दिनांक ०९/०९/२०२३ कामगार कल्याण भवन , राजे रघुजी नगर नागपूर येथे हरिभाऊ नाईक स्मृति समाजसेवा प्रतिष्ठान कडुन ११५ गरजु विद्यार्थ्याना शैक्षणिक साहित्य वितरण करण्यात आले. साहित्य वितरण कार्यक्रमाची सुरवात दिप प्रज्वलन करुन करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय राज्यमंत्री (भा. स.) मा. श्री विलासजी मुत्तेवार तर प्रमुख पाहुने म्हणून अध्यक्ष राष्ट्रीय मिल मंजदुर संघ , मुंबई माजी मंत्री तथा आमदार विधान परिषद(म. रा.) मा. श्री सचिन अहिर माजी मत्री (म. रा. ) मा. श्री सतिशजी चतुर्वेदी तसेच विशेष उपस्थितीमध्ये माजी आमदार तथा कामगार नेते मा. श्री एस. क्यु. जामा, जेष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी लिलाताई चितळे यांच्या सह मंचावर प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री रत्नाकर चेडगे, उपाध्यक्ष श्री सुदाम शिंगणे व सचिव श्री संजय नाईक उपस्थित होते.
यावेळी बोलतांना आमदार सचिन अहीर यांनी हरिभाऊ नाईक यांच्या आठवणीना उजाळा दिला. या कार्यक्रमात महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेणार्या गरजु विद्यार्थ्याना आवश्यक सर्व शालेय साहित्य वितरण उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय नाईक यांनी केली. संचालन शुभांगी पोहरे यांनी केली. सुदाम शिंगणे यांनी सर्व मान्यवराचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करिता श्री अरुण कापसे , श्री प्रकाश चेडगे , श्री राजु नाईक , श्रीमती नंदा पारगुंडे , श्री मोहड सह कार्यक्रमाला राष्ट्रीय मिल मजदुर संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी , कार्यक्रर्ते उपस्थित होते.