Monday, December 23, 2024
Homeराज्यआमदार आशिष जयस्वाल यांच्या स्थानिक विकास निधीतून शवागार पेटीचे वितरण...

आमदार आशिष जयस्वाल यांच्या स्थानिक विकास निधीतून शवागार पेटीचे वितरण…

रामटेक – राजु कापसे

दि.२९ जाने.२०२४ रोजी गांधी चौक, रामटेक येथे आमदार ॲड आशिष जयस्वाल यांच्या स्थानिक विकास निधीतून १० शवागार(शव) पेटीचे वितरण करण्यात आले.

यात नगर परिषद रामटेक,कन्हान,न. पंचायत पारशिवनी, ग्राम पंचायत टेकाडी, तारसा, अरोली, देवलापार, नगरधन, मनसर, शितलवाडी यांना शवागार पेटी देण्यात आले.

यावेळी शिवसेना रामटेक तालुका प्रमुख (शिंदे गट) विवेक तुरक, माजी जि.प.सदस्य नरेश धोपटे, शिवसेना मौदा तालुका प्रमुख प्रशांत भुरे,ग्राम पंचायत शितलवाडी सरपंच जयश्री मडावी, ग्रा. पं. नगरधन सरपंच मायाताई दमाहे, उपसरपंच राम धोपटे,नलिनी चौधरी,माजी नगरसेवक सुमित कोठारी, राजेश किंमतकर, रश्मी काठीकर, धर्मराज रहाटे,

ग्रा. पं. तारसा उपसरपंच चंद्रशेखर गभने, ग्रा. पं.टेकाडी उपसरपंच जितेंद्र चव्हाण,मिताराम सव्वालाखे, दिपक शिवरकर, राहुल ढगे,नंदु लेकुरवाडे, गौरव पनवेलकर, राहुल ठाकुर, टिकाराम परतेती, रोशन पिंपळामुळे, त्रिभुवन सिंह, सचिन कामडे, मनोज सिंह, अतुल यादव, अभिषेक सरोदे, विक्रांत नंदेश्वर सह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: