सांगली – ज्योती मोरे
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त साजरा केल्या जाणाऱ्या सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने सांगलीचे आमदार सुधीर दादा गाडगीळ यांच्या कार्यालयात उच्चतंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते आमदार सुधीर दादा गाडगीळ युवा मंचाच्या वतीने विकलांगांना सायकलींचे वाटप करण्यात आले.
यावेळी आमदार सुधीर दादा गाडगीळ, खासदार संजय काका पाटील, प्रदेश कार्यकारणी सदस्य शेखर इनामदार, ज्येष्ठ नेते मकरंद देशपांडे, युवा मंचाचे अध्यक्ष विश्वजीत पाटील, माजी आमदार दिनकर तात्या पाटील, मुन्ना कुरणे, स्थायी समिती सभापती धीरज सूर्यवंशी, सभागृह नेता विनायक सिंहासने, भाजपचे सर्व नगरसेवक, युवा मोर्चाचे शहर जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा राठोड आदींचा अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.