खामगाव – हेमंत जाधव
अयोध्येहून आलेल्या पूजित अक्षता कलशांचे वितरण रविवारी दुपारी प्रभू श्रीरामाच्या जयघोषात उत्साहात झाले.श्री प्रल्हाद महाराज राम मंदिरात झालेल्या या कार्यक्रमाला संत श्री १००८ हरिचैतन्य जी महाराज पळसखेड,रा. स्व. संघाचे जिल्हा संघचालक बाळासाहेब काळे, विभाग कार्यवाह विजय पुंडे, विश्व हिंदू परिषदेचे प्रांत सहमंत्री ऍड अमोल अंधारे,जिल्हा अध्यक्ष राजेश झापर्डे,श्री प्रल्हाद महाराज राम मंदिराचे अध्यक्ष विलासराव देशमुख,कार सेवेत अयोध्या जन्मभूमी येथे बलिदान झालेले स्व.विष्णुजी नेमाने यांचे बंधू गजानन नेमाने प्रामुख्याने उपस्थित होते.
अनेक वर्षांच्या, अनेक पिढ्यांच्या
संघर्षानंतर अयोध्येत २२ जानेवारीला प्रभू श्रीरामचंद्रांची मूर्ती विराजमान होणार आहे. या कार्यक्रमाचे निमंत्रण घरोघरी दिले जाणार आहे. पण, तेथील जागेची अडचण लक्षात घेता मंदिरे अथवा चौरस्त्यांवर या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण केले जाणार असून, तेथेच नागरिकांना सहभागी व्हायचे आहे. अयोध्येत पूजित निमंत्रण अक्षतांचे सम्पूर्ण भारतात, विदर्भात,जिल्ह्यात ,नगरात आपल्या गावात दि.१जानेवारी ते १५ जानेवारी दरम्यान वितरित केले जाणार आहेत.
सदर अक्षताचे कलश अयोध्या येथून सर्व प्रांतात पाठविण्यात आले विदर्भाचा कलश नागपूर येथील पोदरेश्वर श्रीराम मंदिर येथे पोचल्यावर तेथून सर्व जिल्ह्याला दि.२७नोव्हेंबर रोजी कलश वितरण करण्यात आले. खामगाव जिल्हा कलश श्री प्रल्हाद महाराज राम मंदिरात आणण्यात आल्यानंतर श्री प्रल्हाद महाराज राम मंदिरात १००८ श्री हरिचैतन्य जी महाराज यांचा हस्ते विधिवत पूजा करण्यात आली.
श्रीरामाचा नामजप झाला. मंदिराला प्रदक्षिणा घालून हे कलश जिल्ह्यातील ,शेगाव,मलकापूर,जळगाव,संग्रामपूर, नांदुरा,खामगाव, मोताळा,लाखनवाडा प्रखंडस्थानी वितरित करण्यात आले आहेत.तेथून १७डिसेंबर रोजी ग्रामस्तरावर वितरित करण्यात येतील तरी सर्व ग्राम स्तरांवरील कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी दि.१७ डिसेंबर रोजी प्रखंड स्थानावर पोहचून आपल्या गावचे कलश घेऊन १ जानेवारी पासून आपल्या गावात अक्षत वितरण करावे असे आवाहन ऍड अमोल अंधारे यांनी केले आहे.
कार्यक्रमाचे संचलन अभियानाचे संयोजक विहिंप जिल्हा मंत्री राजेंद्रसिह राजपूत,सह संयोजक रा. स्व.संघाचे संजय बोरे यांनी केले यावेळी जिल्ह्यातील रा. स्व.संघ,विहिंप बजरंग दल,मातृशक्ती दुर्गावाहिनी,श्री प्रल्हाद महाराज राम मंदिर सर्व पदाधिकारी कार्यकर्ते श्रीराम भक्त उपस्थित होते