Monday, December 23, 2024
Homeगुन्हेगारीपिनॉमिक ट्रेडर्सचे संचालक आर्थिक गुन्हे शाखेत हजर त्यांच्यावर कठोर कारवाई करा:-- श्री...

पिनॉमिक ट्रेडर्सचे संचालक आर्थिक गुन्हे शाखेत हजर त्यांच्यावर कठोर कारवाई करा:– श्री शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्तानची पोलीस अधीक्षकांकडे मागणी…

सांगली – ज्योती मोरे.

बोगस शेअर मार्केट कंपनीच्या माध्यमातून गुंतवणूकदारांचे आर्थिक फसवणूक करणारे पिनॉमिक ट्रेडर्सचे संचालक विपुल पाटील,संतोष घोडके, पंकज पाटील आणि अभिजीत हे गेल्या काही महिन्यांपासून गायब होते ते आज आर्थिक गुन्हे शाखेत हजर झालेत त्यांची 7 फेब्रुवारी पर्यंत हजेरी असणार आहे.

त्यानंतर त्यांच्यावर योग्य ती कठोर कारवाई करण्यात यावी, यासाठी आज श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष नितीन चौगुले यांनी सांगली,कोल्हापूर जिल्ह्यातील गुंतवणूकदारांसह पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांची भेट घेऊन मागणी केली आहे.

दरम्यान जास्तीत जास्त गुंतवणूकदारांनी सांगलीतील आर्थिक गुन्हे शाखेत सदर संचालकां विरोधात गुन्हे दाखल करावेत, असं अहवान श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानचे संस्थापक अध्यक्ष नितीन चौगुले यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: