Monday, December 23, 2024
Homeनोकरीसरकारी नोकरी | भूमि अभिलेख विभागात सरळसेवेने पदभरती...

सरकारी नोकरी | भूमि अभिलेख विभागात सरळसेवेने पदभरती…

२८ ते ३० नोव्हेंबर दरम्यान परीक्षा…

अमरावती, दि. 17 (विमाका) : भूमि अभिलेख विभागातील गट क पदसमुह 4 (भूकरमापक तथा लिपीक) संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरीता ऑनलाईन परीक्षा (Computer Based Test) दि. 28 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत आयबीपीएस कंपनीमार्फत राज्यातील विविध केंद्रावर घेण्यात येणार आहे.

परीक्षेचे विभागनिहाय वेळापत्रक व उमेदवारांचे परीक्षेचे प्रवेशपत्राबाबत विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर (https://mahabhumi.gov.in) लिंक उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांनी संबंधित संकेतस्थळावर प्रवेशपत्र डाऊनलोड करुन प्रवेशपत्रावर नमुद परीक्षा केंद्रावर उमेदवाराने दिलेल्या वेळेत उपस्थित राहून परीक्षा द्यावी.

परीक्षा पद्धतीबाबतची सविस्तर माहितीपुस्तिका विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच परिक्षेचे प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी लिंकदेखील दि. १४ नोव्हेंबरपासून विभागाच्या उपरोक्त संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येईल. याची सर्व परीक्षार्थींना नोंद घ्यावी, असे उपसंचालक (भूमि अभिलेख) विलास शिरोळकर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

उमेदवारांच्या सुलभतेसाठी https://mahabhumi.gov.in संकेतस्थळ

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: