Saturday, July 13, 2024
spot_img
Homeराज्यव्हाईस ऑफ मीडिया सावनेर शाखेच्या वतीने स्थानिक कामाक्षी सभागृहात १७ फेब्रुवारी २०२४...

व्हाईस ऑफ मीडिया सावनेर शाखेच्या वतीने स्थानिक कामाक्षी सभागृहात १७ फेब्रुवारी २०२४ शनिवारी दुपारी १ वाजता डिजिटल दैनिक विंग पत्रकार स्नेहमीलन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला…

रामटेक – राजु कापसे

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी संपत खलाटे होते प्रमुख अतिथी म्हणून मध्यप्रदेश मीडिया संघाचे अध्यक्ष गयाप्रसाद सोनी पिटीआय न्यूजचे जिल्हा ब्युरो विजय ठाकुर नागपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी जिल्हा अध्यक्ष प्रा बाबा टेकाडे, पांढुर्णा मीडिया संघाचे अशोक सोनी समाचार नेशनचे छिंदवाडा अध्यक्ष कुंजबिहारी शर्मा डिजिटल मीडिया नागपूर जिल्हा अध्यक्ष देवनाथ गंडाटे आदी मान्यवर मंचकावर होते.

या स्नेहमीलन सोहळ्यात सावनेर कळमेश्वर नागपूर मौदा भिवापूर रामटेक कुही मांढळ पारशिवणी हिंगणा कामठी नरखेड काटोल आदी गावातील पत्रकार अधिक संख्येने उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांनी पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांची सुरक्षा महत्वाची आहे शासनाने त्यांना सुरक्षा प्रदान करावे अधिस्वीकृती कार्ड द्यावे आरोग्य सुविधा मिळावी त्यांच्या वृद्धकाळात आर्थिक सहाय्यची नितांत गरज आहे ग्रामीण क्षेत्रातील पत्रकार हे वृत्तपत्राचे खरे आधारस्तंभ आहेत असे मोलाचे मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वेदश्री देशपांडे यांनी केले संजय टेंभेकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी दिलीप घोडमारे कैलास शर्मा राहुल सावजी संतोष धानोरकर नितेश गव्हाणे वाहिद शेख अनुप पठाने चंदू मडावी गिरीश अंधे दिनेश चौरसिया रविना श्यामकुळे यांनी सहकार्य केले. याप्रसंगी व्हाईस ऑफ मीडिया सावनेर तालुक्याचे पदाधिकारी आणि सदस्य अधिक संख्येने उपस्थित होते.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: