माजी उपसभापती उदयसिंग उर्फ गज्जुजी यादव यांच्या प्रयत्नांला यश…
रामटेक – राजु कापसे
रामटेक येथील उपजिल्हा रुग्नालयात लवकरच किडणी रुग्नांसाठी डायलिसिस युनिट सुरु होणार. डायलिसिस युनिट मुळे रामटेक, पारशिवनी, मौदा तहसील मधील रुग्णांना भरपूर फायदा होईल.
रामटेक पंचायत समिती चे माजी उपसभापती उदयसिंग उर्फ गज्जु यादव यांनी महाविकास आघाडी सरकारचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना विनंती करुण दिनांक २९/०९/२०२१ रोजी विनंती करुण रामटेक येथे डायलिसिस युनिटची मागणी केली होती. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सबंधिल अधिकार्यांना आवश्यक कार्यवाही चे आदेश देले.
महाविकास आघाडीचे सरकार बदलले. सरकार बदलल्यानंतर गज्जु यादव यांनी विद्यमान सरकार मधले आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची भेट घेतली. तसेच महाराष्ट्र प्रेदेश भाजप अध्यक्ष व विधान परिषद आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन दिले. व त्यांच्या कडे रामटेक उपजिल्हा रुग्णांलयात डायलिसिस युनिटची मागणी केली.
रामटेक उपविभागात येणारे पारशिवनी , मौदा तहसिल चे गावाचे रुग्ण किडणी उपचारासाठी नागपूर येथे येणे जाणे करते. त्यामुळे रुग्णांना मानसिक , शारीरिक व आर्थिक गोष्टीचा सामना करावा लागत होता. रुग्ण विभाग च्या मागणी आधारे रामटेक उपजिल्हा रुग्णालय येथे डायलिसिस युनिट ला मंजुरी देण्यात आली.
रामटेक उपजिल्हा रुग्णालय येथे डायलिसिस युनिट सुरु होण्यामुळे रुग्णांना खुब फायदा होईल. डायलिसिस युनिट सुरु करु करण्यासाठी मंजुरी देण्यासाठी गज्जु यादव यांनी आरोग्य मंत्री मा. तानाजी सावंत तसेच प्रदेश अध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार व्यक्त केले. आणि डायलिसिस युनिट मंजुरी मिळाल्यामुळे श्री उदयसिंग उर्फ गज्जु यादव यांनी स्थानीक लोकांचे अभिनंदन केले.