Monday, December 23, 2024
Homeगुन्हेगारीधुळे | मित्रांची मजाक मस्करी तरुणाच्या जीवावर बेतली...कॉम्प्रेशर प्रेशर मशीनची हवा गुप्तांगात...

धुळे | मित्रांची मजाक मस्करी तरुणाच्या जीवावर बेतली…कॉम्प्रेशर प्रेशर मशीनची हवा गुप्तांगात सोडल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू…

धुळे : साक्री तालुक्यातील छडवेल कोर्डे येथील सुजलॉन कंपनीत काम करणाऱ्या तरुणाच्या गुदद्वारात त्याच्याच सहकाऱ्याने प्रेशर नळी लावुन मस्करी केल्यामुळे तरुणाना मृत्यू झाला आहे, तुषार निकुंभ असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ आरोपी असलेल्या सहकर्मचाऱ्याला ताब्यात घेत अटकेची कारवाई केली. आता आरोपीची कसून चौकशी केली जाते आहे. रविवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली.

तुषार सदाशिव निकुंब नावाचा तरुण एका खासही कंपनीत कामाला होता. ही कंपनी इंटिग्रेटेड इंजिनिअरींग सेवा पुरवते. या कंपनीत काम करणारे कर्मचारी आपल्या कपड्यांवर लागलेली धुळू हटवण्यासाठी एअर प्रेशर पंपाचा उपयोग करायचे. दरम्यान, एक दिवस कामानंतर धूळ हटवत असताना एका कर्मचाऱ्याने तुषारला पकडलं आणि त्याच्या गुदद्वारात एअर पंपचा नोजल घुसवा.

या तरुणाला हा सर्व प्रकारानंतर त्रास होऊ लागला आणि त्यानंतर त्याला तात्काळ नंदुरबार येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले परंतु त्याची प्रकृती आणखीनच बिघडल्यामुळे तेथून नातेवाईकांनी सुरत येथे उपचारासाठी नेले असता उपचारादरम्यान सुरत येथील रुग्णालयात या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे,

याप्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून, संबंधित तरुणाच्या मित्रांनीच हा सर्व प्रकार मजाक मस्करी दरम्यान केला असून त्या मजाक मस्करी मध्ये या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, या घटणेची माहिती परिसरात पसरतात परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: